पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/395

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७० डेरादाखल झाले.या लष्कराहून पुढे दोन कोसांवरी मुकाम केला आहे. दोन चार रोज मुक्काम करून लोकांचे हिशेबकितेब आजमास मनास आणून दरमजलींनी येऊन पोहचतात. पावणा लाखपर्यंत फौज जमा जाहली आहे. पन्नास हजार फौजेनिशी हिंदुस्थानांत येत आहेत. पंचवीस हजार फौज देशी राहिली. निजामअल्ली व बसालतजंग व सलाबतजंग ऐसे त्रिवर्ग एकत्र जाहले. कलबुर्गेयास जाणार होते. फौज दाहा पंधरा हजारपर्यंत आहे. लबाडी करावयास चुकणार नाहीं; याजकरितां श्रीमंत दादासाहेब यांजपाशीं पंचवीस हजार ठेवून गंगातीरी ज्येष्ठमासपर्यंत दादासाहेब राहणार. श्रीमंत राजश्री नानासाहेब दरमजल पुणियास जाणार. कर्नाटकांत र॥ विसाजी कृष्ण बिनीवाले यांजबरोबर दाहा हजार फौज व दाहा तोफा देऊन रवानगी जाहली. बंदोबस्त यथास्थित केलाच आहे. पुढें अबदालीचे पारिपत्याबद्दल श्रीमंत येत आहेत. यांची सलाबत पुण्यप्रताप भारी आहे. त्याचें पारपत्य होते. कांही चिंता नाही. मित्ती फाल्गुन वद्य १४. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विज्ञापना.


[ १६९] ॥ श्री॥ २० मार्च १७६०, तीर्थस्वरूप राजश्री गोविंदपंत दादा वडिलांचे सेवेसी: अपत्ये बाबराव स॥ नमस्कार विनंति तागाईत चैत्र शुद्ध ३ तृतीया मु॥ सिंदखेड वर्तमान यथास्थित असे. विशेष. वडिलीं फाल्गुन शुद्ध तृतीयेची नालबंदी व खजिना साक्षात् काढून दिला ही अशी उघड तिरस्काराची कृती नानासाहेबासारखा पुरुष करणार नाही ह्याची प्रत्येक इतिहासज्ञाला खात्री आहे. दादासाहेबांनी जावें हें नानासाहेबांच्या मनांत. अबदाली हिंदुस्थानांत अलीकड आल्यापासून व दोन मोहिमांचा अनुभव घेतल्यावर, निखालस नव्हते, हे जे बखरकार ह्मणतात तेंच खरे आहे. १. २५५ फाल्गुन शुद्ध तृतीयेला ह्मणजे १९ फेब्रुवारी १७६० ला अबदाली अवसान