पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/394

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मजकुरास आले. तेथून फाल्गुन वद्य त्रयोदशीस श्रीमंत राजश्री भाऊसाहेब उदारपणाचा व भोळेपणाचा फायदा घेऊन दौलतीचे नुकसान करीत व ह्या गोष्टी दादांच्या ध्यानांत वेळी येत नसत. दादांनी दोन स्वाऱ्या हिंदुस्थानांत केल्या, पण मिळकत कवडीचीहि केली नाही. मल्हारराव होळकर, अंताजी माणकेश्वर, गोविंदपंत, सुजाअतदौला, नजीबखान, नारोशंकर, लक्ष्मणशंकर, दामोदर महादेव ह्या सर्व मंडळीनें दादांना फसवून दौलतीचे नुकसान केले होते. तसें नुकसान ह्या मोहिमेंत होऊ नये; मल्हारराव व गोविंदपंत ह्यांच्यासारख्या वृद्ध हितशत्रूना खोडून काढावें; व एकंदर मनसवा मोठ्या खोल शहाणपणाने उरकावा, एतदर्थ नानांनी भाऊंची योजना ह्या मोहिमेवर केली व ही आंतील कारणे जाहीर करण्यासारखी नसल्यामुळे, दादांच्या कर्जबाजारीपणाचे मोठे प्रदर्शन केले. मल्हारराव दौलतीच्या विरुद्ध काम करीत आहे हे ते जाणून होते. ह्या शठशिरोमणीचे डावपेंच हाणून पाडण्यास भाऊसारखाच मनुष्य, अवदालीसारखा शत्रु पुढे उभा असतां, पाठविणे जरूर होतें, आणि ह्मणून भाऊंचीच योजना ह्या कामावर मकरर झाली. आतां अशी शंका निघण्याचा संभव आहे की अगोदर तरी दादांची नेमणूक करण्याचे काय कारण होते? त्यावेळी दादांच्या आंगचा हा भोळेपणा नानांना माहीत नव्हता की काय ? तर ह्याला उत्तर असें आहे की, दादांची योजना जी प्रथम झाली होती ती दत्ताजी व जनकोजी बंगाल्यावर मोहीम करतील व त्यांच्या मदतीला इकडून दादांना पाठविता येईल, ह्या अंदाजावरती झाली होती ( पत्रे व यादी ३७३ ). पुढे डिसेंबर-जानेवारीत अबदालीच्या हस्ते शिंद्यांच्या पराजयाची जेव्हां वर्तमाने आली तेव्हां कायमची योजना होईतोपर्यंत “दादा अविलंब येतील" असेंच लिहिणे भाग पडले. नंतर दक्षिणेतील " मोगलाचा कारभार निर्गमांत " आल्यावर उत्तरेकडील मोहिमेवर कोण येतो तें जाहीर करणे योग्य वाटलें. येणेप्रमाणे दादांचा भोळेपणा हा भाऊंच्या जाण्याचे मुख्य कारण आहे. नानाभाऊंचा मत्सर, दादा व सखारामबापू यांचा स्नेह, गोपिकाबाईचा द्वेष, इत्यादिहि दुसरी आनुषंगिक कारणे असतील; परंतु त्यांचा येथे विचार करण्यास अवकाश नाही. भर नालबंदी व एक क्रोड रुपये खजिना बराबर देत असल्यास दादा जाण्यास तयार होते; परंत नानासाहेबांना ह्या अटी पसंत पडल्या नाहीत. कारण, नानासाहेबांचे मनांत दादासाहेबांस पाठवावें असें निखालस नव्हते; असें भाऊसाहेबाच्या बखरी ( पृष्ठ ८७ ) त लिहिले आहे. पुढें भाऊसाहेब मोहिमेला निघाले तेव्हां त्यांच्याबरोबर पन्नास हजार सैन्य होते. त्या सर्व सैन्याला भाऊसाहेबांनी तमाम नालबंदी दिली व कांही खजिनाहि बरोबर घेतला. ( लेखांक १६९ व भाऊसाहेबांची बखर पृष्ठ ८७९० ). तेव्हां दादासाहेबाला नालबंदी व खजिना मिळणार नाही ह्मणून सांगितलें व भाऊसाहेब जाऊ लागले असतां भर