पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/393

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६८ जावें, ऐसा सिद्धांत होऊन पडदुराहून वद्य एकादशीस कुच करून मु॥ ७ मार्च १७६० च्या सुमाराला तें सर्व गाडे फिरलें व भाऊसाहेबांनी जावें असें ठरले. कोणी जावें याचा निश्चय होण्याचे अगोदर ह्मणजे उदगीरची लढाई झाल्यावर लागलेच लहान मोठ्या सरदारांना हिंदुस्थानच्या मोहिमेस पाठविण्याचा क्रम सुरू झाला होताच. संताजी वाघ, इभ्राइमखान गार्दी, दमाजी गायकवाड (ऐतिहासिकलेखसंग्रह नं. १४ ) इत्यादि मंडळी लगेच डेरेदाखल सुद्धा झाली (लेखांक १६३). आतां खाशांपैकी झणजे दादाभाऊंपैकी कोणी जावें हाच सिद्धांत काय तो ठरावयाचा होता. तो सिद्धांत सात आठ दिवसांत ठरून भाऊंनी जावें असा १३ मार्चला कायमचा निश्चय झाला व दादांनी घरचा कारभार पहावा असें ठरलें (ऐतहासिकलेखसंग्रह नं. १४ ). आतां दादांना घरी रहाण्यास व भाऊंना स्वारीस जाण्यास कारणे काय झाली ? मोहिमेहून दादा कर्ज करून येत ह्मणून भाऊ त्यांना टोचून बोलले, सबब दादांनी मोहिमेस जाण्याचे नाकारले, हे एक विधान आहे. त्यांत तथ्य किती आहे त पाहूं. दादा लाहोरच्या मोहिमेहून आले ते साठ लक्ष ( भाऊसाहेबाची कैफियत), ऐशी लक्ष (ग्रांटडफ), अठ्यायशी लक्ष ( काशीराज ), एक कोट ( नातूकृत महादजीचें चरित्र ), रुपय कर्ज करून आले, असे निरनिराळे कर्जाचे आंकडे आहेत. पैकी ग्रांटडफने दिलेला आकडा खरा घेऊन ( त्याने पेशव्यांचे हिशेब तपासले असें धरून ) पेशव्यांना ह्या कर्जाचे मोठे ओझे वाटले की काय ते पाहूं. पेशव्यांना कर्जाचे ओझें वाटले असते तर दादांची हिंदुस्थानच्या मोहिमेवर पूर्वीपासून योजना यांनी करून ठेविली नसती. शिवाय ऐशी लक्षांचे कर्ज ह्मणजे त्याकाळी मोठीशी बाब नव्हती. दादासाहेबाचा एकट्याचा वार्षिक खर्च ऐशी लाखाचा असे ( एतिहासिकलेखसंग्रह नं. ५५५). पानिपत होऊन माधवरावाच्या हाती राज्य आले तेव्हां दौलतीला काय तें एक दीड कोटींचे कर्ज होते ( ऐतिहासिकलेखसंग्रह नं. ५५). तेव्हां पानिपताच्या अगोदर पेशव्यांना फारसें कर्ज होतें व दादासाहेबाच्या ह्या कर्जाचे त्यांना ओझें वाटले असें दिसत नाही. शिवाय नुकताच ६२ लक्षांचा मुलुखहि त्यांना मिळाला होता. १७५९ फेबवारीला पेशव्यांना ७० लाख रुपये कर्ज होते व तीस लाख रुपये त्यांनी नुकतेच फेडले होते ( पत्रे व यादी ३७३ ). दादांची लाहोरची मोहीम संपल्यावर सहा महिन्यांनी हे ७० लाख कर्ज राहिले असें पेशवे लिहितात. दादा कर्जे करीत असत; परंत त्याने ह्मणजे ते नालायक ठरले गेले होते असें बिलकूल नाही. तेव्हां दादासाहेबाच्या न जाण्याबद्दल हे कर्जाचे जे कारण देतात तें प्रायः लौकिक असून खरें नाही असे वाटते. खरे कारण आमच्या मते अगदीच निराळे असावें. कोठेहि गेलें तरी दादांचा कारभार सरळ असे. ते सांबासारखे भोळे होते. त्यांना त्यांच्या वेळची मंडळी उपहासाने सांव ह्मणून ह्मणत असत. यामुळे पदरचे सरदार व बाहेरचे शत्रू त्यांच्या