पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/392

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६७ आठ रोजपर्यंत खलबत जाहलें. शेवटीं श्रीमंत राजश्री भाऊसाहबीं ह्मणजे ७ मार्च १७६० रोजी ह्मणजे उदगीरच्या लढाईनंतर एक महिना आणि चार दिवसांनी पडल्या. ही फाल्गुन वद्य ५ ह्मणजे रंगपंचमीच होय. रंगपंचमी झाल्यावर मग हिंदुस्थानाच्या स्वारीला कोणी जावें ह्यासंबंधी आठ दिवस खलबत झाले. भाऊसाहेबाच्या बखरीत हे खलवत रंगपंचमीच्या अगोदर झाले व नंतर पंचमीला रंग खेळून झाल्यावर मोहिमेवर आपण जाणार असें भाऊसाहेबांनी सांगितले असे लिहिले आहे. परंतु तें, अर्थात् कालविपर्यासाच्या दोषास्तव, अग्राह्य आहे. कित्येक बखरीतून हा प्रकार उदगीरच्या लढाईच्या अगोदर पुण्यास घडला असे लिहिलेले आढळतें तें तर स्थलविपर्यासाच्या दोषास्तव केवळ तिरस्करणीय आहे. पानिपतच्या मोहिमेस निघतांना झालेल्या ह्या रंगांत व वाटरींच्या लढाईच्या अगोदर ब्रूसेल्स येथे झालेल्या नाचांत कांहींसें साम्य आहे. जयापजयाचेंच तेवढें वैषम्य आहे ! २५४ हिंदुस्थानच्या मोहिमेस कोणी जावे ह्यासंबंधी निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे वृत्तांत सांपडतात. (१) मुळी कोणी खाशांनी ह्मणून जाऊ नये. (२) एखाद्या सरदाराला पाठवून द्यावें. (३) मोहिमेहून दादा कर्ज करून येतात तेव्हां त्यांना पाठवू नये. (४) भाऊंचा व नानांचा अंतस्थ द्वेष होता ह्मणून भाऊंना नानांनी पाठविले. ( ५ ) भाऊ कोणाचें न ऐकून खतःच गेले. (६) दादा कोणाचें न ऐकून स्वतःच्याच बुद्धीने घरी राहिले. (७) सातारचे महाराज, महादोबा पुरंधरे, इत्यादींना भाऊंनी निर्माल्यवत् करून सोडिलें, ते चांगले नव्हे, ह्मणून नानांनी भाऊंना उत्तरेकडे पाठवून दिले. (८) गोपिकाबाईच्या द्वेषामुळे भाऊंना जावे लागले, इत्यादि अनेक तर्क अनेकांनी केले आहेत. पैकी, कोणी खाशांनी जाऊं नये असें नानासाहेबांचे मत होतें ह्मणून रा. नातू " महादजीच्या चरित्रांत " पृष्ट ५७, सांगतात. परंतु लेखांक १५७ त " चिरंजीव राजश्री दादासच अविलंबें रवाना करूं, " असें खुद्द नानासाहेब लिहितात. व पुढे ह्या लिहिण्याची एकसारखी पुनरावृत्ति करतात; तसेंच भाऊंनीहि " चिरंजीव राजश्री दादा त्या प्रांतें अविलंबें येतील" ह्मणून १९ फेब्रुवारी १७६० रोजी लि. हिले, ह्यावरून खाशांपैकी कोणास पाठविण्याचे नानासाहेबांच्या मनांत नव्हतें असें मुळींच ह्मणतां येत नाही. उलटें खाशांखेरीज काम भागणार नाही असे सर्वांचे मत होते. एकाद्या सटरफटर सरदाराला पाठवून चालावयाजोगे नव्हते. पेशव्यांचे मोट्यांत मोठे सरदार मटले ह्मणजे शिंदेहोळकर हे होत. ह्यांचा पराभव जेथें झाला तेथे त्यांच्याहूनहि कोणी जबरदस्त जाणें जरूर होतें. अशी जबरदस्त असामी ह्मटली ह्मणजे खाशांखेरीज इतरत्र सांपडणे कठीण होते. प्रथम १९ फेब्रुवारी १७६० पर्यंत तरी दादांची नेमणूक त्या कामावर झाली होती. परंतु रंगपंचमीला ह्मणजे