पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/391

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६६ होणे हे आदि आहे. बातमी व ऐवजाची तरतूद लिहिलेप्रमाणे येऊन पावेसे करणे. सुजादौला तूर्त मेळवून घेतले पाहिजेत. न मिळाले तर निमित्यास जागा आहे. तिकडील राजकारणें चार असतील तीहि राखून ठेवावी. फार फॉर कामे करून दाखवावी हे तुमची उमेद. त्याप्रमाणे करणे. कराल हा भरंवसा आहे. ॥ छ २६ रजब. बहुत काय लिहिणे. हे विनंति. पे॥ छ २७ साबान. [ १६८] ॥श्री॥ १६ मार्च १७६०. तीर्थस्वरूप राजश्री गोविंदपंत दादा वडिलांचे सेवेसीः अपत्ये बाबूराव साष्टांग नमस्कार विनंति त॥ फाल्गुन वद्य ३० अमवाशा मु॥ शिंदखेड वर्तमान यथास्थित असे. विशेष. सांप्रत वडिलाकड़न पत्र येऊन वर्तमान कळत नाही. तरी सविस्तर लेहून पाठवावें. यानंतर इकडील वर्तमान तरी श्रीमंत राजश्री नानासाहेब आमदानगराहून कुच करून दरमजल पडदुरास आले. व श्रीमंत राजश्री भाऊसाहेब मोंगलाचा उपमर्द करून तह करून आले. पडदुरचे मुकामी उभयतां श्रीमंतांच्या भेटी फाल्गुन वयं पंचमीस जाहल्या. तदोत्तर हिंदुस्थानचे रवानगीचा प्रकार जाहला. ण्याच्यावेळी ह्मणजे ५ मार्च १७६० रोजी गोविंदपंत आपल्या प्रांतांत जाऊन वसले असतील असा भाऊंचा समज होणे रास्त आहे. परंतु, गोविंदपंत ४ मार्च १७६० ला ग्वालेरसि होते हैं लेखांक १६० च्या पैवस्तीवरून स्पष्ट आहे. तेव्हां भाऊंचा तो समज अस्थानी होता हे आतां ठरल्यासारखे आहे. २५२ पुण्याच्या दरबारी असतांना व तेथील दरवारास पत्रे पाठवितांना गोविंदपंत ह्या वाक्याचा फार उपयोग करीत, असे दिसते. अर्थात् गोविंदपंताच्या ह्या ठरीव वाक्याची आठवण त्यांना करून देणे भाऊंसारख्या मुत्सद्याला शोभण्यासारखेच होते. ह्यावेळी गोविंदपंताचे वय निदान साठाखाली तरी नसावें. गोविंदपंताचें दत्तविधान शके १७२८ त झाले. -- २५३ नानासाहेब व भाऊसाहेब यांच्या गांठी पडदुर मुक्कामी फाल्गुन वद्य पंचमी,