पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/388

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राहिली नाहींच. भागानगराकडे जातील. त्यास चिरंजीव राजश्री दादांनी यावें, परंतु तीर्थरूपांची आज्ञा आह्मींच जावें ही जाहाली. त्यांज च्या अगोदर निकडीचीं पदें येण्याचे काहीएक कारण नव्हते; इतकेच नव्हे, तर निकडीची पत्रे नोव्हेंबर १७५९ पर्यंत आली नाहीत. त्याच्यानंतर मात्र निकडीची पत्रे येऊ लागली तीहि प्रथम शिंद्यांनी पाठविली नव्हती; गोविंदपंताने पाठविली होती. येणेप्रमाणे पहिल्या विधानांतहि काही तथ्य नाही. आतां दुसऱ्या विधानाकडे वळू. विजयादशमीनंतर एका महिन्याने अबदाली लाहोरास आला. तेव्हां विजयादशमीच्या दिवशी व त्याच्या अगोदर एक दोन महिने पेशव्यांची खलबतें चालली असतील तेथे अबदालीवर हिंदुस्थानांत मोहीम करावयाच्यासंबंधी बोलणे वस्तुतः कांहींच निघण्याचा संभव नव्हता. कारण, त्यावेळी शिंद्यांच्या रोहिल्यांशी व दुरून सुजाअतदौल्याशी झटापटी चालल्या होत्या व अबदाली येणार ह्याची वार्ताहि नव्हती. काशी, बंगाल, अयोध्या, पाटणा, इत्यादि पूर्वेकडील प्रांतांवर स्वारी करण्याचा शिंद्यांचा विचार होता व त्या कामी मदत करण्याकरितां दादांना दसऱ्यास पाठवून देऊं ह्मणून आश्वासन होतें ( पत्रे व यादी ३७३ ). परंतु, दसऱ्याच्या सुमारास शिंद्यांवरती कोणताहि मोठा घोर प्रसंग न आल्यामुळे, बंगाल्याकडेहि त्यांच्या हातून प्रस्तुत कांहीं काम न झाल्यामुळे व रोहिल्यांशी लहानसान झटापटी करण्यांत ते गुंतले आहेत असे समजल्यामुळे, हिंदुस्थानच्या मोहिमेचा विचार सोडून द्यावा लागला व दादांची मोहीम जेथल्या तेथेंच राहिली. जर दसऱ्याच्या अगोदर अवदालीने शिंद्यांस पछाडलें असतें व शिंद्यांची पेशव्यांना मदतीकरितां येण्याची निकडीची पत्रे आली असती तर दसऱ्याला पेशवे तडक हिंदुस्थानाकडे चालून गेले असते व नगरचा किल्ला हाती आला असतांहि निजामासारख्या लुंग्यासुंग्या शत्रूशी सहा महिने लढत बसण्याचे व सरदारांच्या मदतीच्या आड येण्याचें साहस नानासाहेबांसारखा मुत्सदी कधीहि न करता. येणेप्रमाणे हिंदुस्थानांत मोहीम करण्याचा ह्यावर्षी बिलकुल विचार नव्हता. भाऊसाहेबाच्या मनांत ह्यावर्षी निजामाला पालथा पाडण्याचे व श्रीरंगपट्टण हाताखाली घालण्याचे बेत घोळत होते. ह्याच हेतूंच्या फलप्रीत्यर्थ राजकारण करून नगरचा किल्ला भाऊसाहेबांनी घेतला व पुढे निजामावर चालून अर्धा अधिक रस्ता आटोपतात तों उत्तरेकडून अबदालीच्या दंग्याच्या बातम्या येऊन थडकल्या. तेव्हां हिंदुस्थानांत मदतीला जावे लागणार असें पेशव्यांना पक्कं कळून चुकलें. ताबडतोब जाऊं ह्मटले तर इकडे मसलत ही अशी अर्धीमुधी गुंतलेली होती. ती बऱ्या वेताने उरकून लवकर जावें झटले तरी महिना दोन महिने लागणार. तेव्हां उदगीरच्या लढाईच्या मोहिमेंतन दादा लवकरच येतात ह्मणून नाना, दादा,