पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/387

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ त्याचा गुंता नाही. ब-हाणपुरांत अम्मल जाहाला. शहर हवाली जाहालें. एक दोन स्थळे हवाली होणे ती होतील. इकडील मोंगलाची गरमी मे, १७६० ). येणेप्रमाणे १७५९ च्या मार्च महिन्यांत दत्ताजी व जनकोजी लाहोरास होते व १७५९ च्या जून माहन्यांत अंतर्वेदात सुजाअतदौल्यासी लढाई करण्याच्या खटपटींत होते. अर्थात् , “ महादजीच्या चरित्राच्या" ५४.५५ पृष्टांवरील तारखा एका वर्षानें चुकल्या आहेत हे स्पष्ट आहे. शिकंदर शहरावर सरदारांनी हल्ला केला तो शिमगी पौर्णिमेला ह्मणजे १ मार्च १७६० रोजी केला व १७६० च्या एप्रिल-मेंत शिंदे, होळकर, जयपूर प्रांती धापा टाकीत बसले. ह्यावेळी ह्मणजे एप्रिल-मेंत भाऊसाहेब खेचीवाड्याच्या पुढे चालून गेले होते ( ऐतिहासिकलेखसंग्रह नंबर २२ ). तेव्हां शिंदेहोळकरांनी केरौलीचे आसपास १७५९ जूनांत तळ दिल्यानंतर उदगीरची मोहीम झाली व तदनंतर भाऊसाहेव हिंदुस्थानच्या स्वारीस निघाले असें जे रा. नातूंनी लिहिले आहे ते ह्या तारखांचा बराबर मेळ न बसल्यामळे झाले ह्यांत शंका नाही. तसेंच विजयादशमीच्या वेळेसच रघुनाथरावाचा जावयाचा बेत रहित झाला असेंहि रा. नातू " महादजीच्या चरित्राच्या" ५६ व्या पृष्टांत लिहितात, तेहि चूक आहे. कारण उदगीरच्या मोहिमेंत दादा होते ( लेखांक १५७, १५९, १६१, १६५); इतकेच नव्हे, तर हिंदुस्थानच्या मोहिमेसहि त्यांनाच पाठविण्याचा उदगीरची मोहीम संपेतापर्यंत विचार होता.. (ब) "शिंदेहोळकरांची” ( १७५९ जूनची किंवा नंतरची) “ निकडीची पत्रे आल्यामुळे, पेशव्यांनी हिंदुस्थानांत फौज पाठविण्याचा निश्चय केला व स्वारीस रघुनाथरावाने जाण्याचे ठरले.” परंतु, “ विजयादशमीच्या मुहूर्ते रघुनाथरावाचा जाण्याचा बेत रहित झाला.” असें रा. नातू “ महादजीच्या चरित्रांत "( पृष्ठ ५५ ) ह्मणतात. ह्यांत एकंदर पांच विधानें रा. नातू ह्यांनी केली आहेत. ( १ ) शिंदेहोळकरांची निकडीची पत्रे विजयादशमीच्या अगोदर आली. ( २ ) विजयादशमीच्या अगोदर पेशव्यांचा हिंदुस्थानांत फौज पाठविण्याचा निश्चय झाला. ( ३ ) विजयादशमीच्या अगोदर रघुनाथरावाने जावे असे ठरले. (४) विजयादशमीच्या दिवशी किंवा नतर रघुनाथरावाचा बेत रहित झाला. व (५) अबदाली १७५९ मार्चच्या अगोदर हिंदुस्थानांत आला. पैकी, मागील तारखांकडे पाहिले असतां पांचव्या विधानांत काही अर्थ नाही. कारण १७५९ च्या मार्च व एप्रिल महिन्यांत दत्ताजी सतलज नदीवरून लाहोरचा बंदोबस्त करीत होता; अर्थात्, अबदाली त्यावेळी हिंदस्थानांत नव्हता, हे स्पष्ट आहे. अबदाली नोव्हेंबर १७५९ त लाहोरास दाखल झाला (लेखांक १४०); तेव्हां दसऱ्याच्या ह्मणजे १ अक्टोबर १७५९