पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/389

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डला चरून छ २५४६ रजबीं हिंदुस्थानांत यावयास निराळे जाहालों. चिरंजीव राजश्री विश्वासराव बरोबर आहेत. त्यास, अबदालीकडील खबर वरचेवर कळली पाहिजे. तुमच्या तालुकियाचा बंदोबस्त कसा आहे ते सर्व लिहिणे. मल्हारबा, जनकोजी शिंदे यांजकडील बातमी जलदीने येत नाही. तरी तेथे कोण्ही ठेऊन तिकडील बातमी जलदीने पाठवीत जाणे. सुजाअतदौला सर्व प्रकारे स्नेह राखितात. सरदारांनी व चिरंजीवांनी त्यांचे ठायीं ममतेत अंतर केले नाही. या दिवसांत त्यांणी सरदाराचे विचारें अबदालीचें पारिपत्य करावें, हेच त्यास उचित आहे. त्यांणीं अबदालीस सामील होणे; अबदालीची नड हिंदुस्थानचे पातशाहीत रुतों देणे हे अयोग्य ! याचा भाऊ ह्यांनी सरदारांना पत्रे पाठविली (लेखांक १५२, १५४, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६५). भाऊसाहेबाचे मनांत ह्या सवंद वर्षांत उत्तरेकडे जावयाचे नव्हतें हैं लेखांक १६५ च्या शेवटच्या काही वाक्यांवरून कळून येईल. “तिकडेहि अबदालीचा पेच. तिकडील पंचामुळे इकडे आटोपावें लागले. कर्नाटकची स्वारी न झाली. नाही तरी सारी दक्षिण मोकळी होती. " हे भाऊच्या डोक्यात विचार होते. तेव्हां दसऱ्याच्या अगोदर हिंदुस्थानांत मोहिम करण्याचा विचार नव्हता हे निश्चित आहे. हिंदुस्थानांत मोहिम झाली तर दादांनी जावे असा दसऱ्याच्या अगोदर फेब्रुवारी १७५९ च्या सुमारासच बेत झाला होता ( पत्रे व यादी ३७३ ). तो बेत दसऱ्याच्या अगोदरहि फिरला नाही. कारण मोहीमच झाली नाही व दसऱ्याच्या नंतरहि उदगीरची लढाई संपेतोपर्यंत फिरला नाही. उदगिरची लढाई होऊन आंबेपडदुरास जेव्हां स्वाऱ्या आल्या तेव्हां तो बेत फिरला. येणेप्रमाणे ह्या पांचहि विधानांचे निरसन झाले. यःकश्चित् तारीख चुकली असतां इतिहासकार काय काय बुचकळ्यांत पडतात ह्याचा हा एक मासला आहे. (क ) आफगाण लोक १७५९ च्या सप्टेंबरांत यमुना उतरून अनुपशहरी आले ह्मणून कीन ह्मणतो ( Fall of the Mogul Empire p.41 ). १७५९ च्या नोव्हेंबराच्या समारास अबदाली लाहोरास आला (लेखांक १४३ ) त्याअर्थी हे विधान निराधार आहे. २४६ १४ मार्च १७६०. २४७ १७५५ त सुजाअतदौल्याने प्रयाग देऊन काही पैसा देण्याचें दादांपाशी कबूल केले होते. पुढे प्रयाग न देतां पैसा देण्यास त्याने दोन तीन वर्षे लाविली.