पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/386

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कारभार निर्गमांत आला. जागिरीत अम्मल बसला. कोठे कोठे बसणे मे १७५८ त रघुनाथरावदादा लाहोरास होते (लेखांक १२४, पत्रे व यादी ३४१). पुण्यास परत जातांना त्यांना जनकोजी व दत्ताजी वाटेत भेटले. २४ डिसेंबर १७५८ त लाहोराकडील बंदोबस्त करण्यास दत्ताजीनें अवश्य जावें, कारण तेथील सुभा अदिनाबेग मृत्यू पावला, अशा अर्थाचें पत्र नानासाहेबांनी धाडिलें (पत्रे व यादी ३८८). २४ फेत्रुवारी १७५९ पर्यंत दत्ताजी लाहोरास गेला नव्हता (पत्रे व यादी ३७३ ). २१ मार्च १७५९ त दत्ताजी लाहोरास होता व नानासाहेबांचे त्या तारखेचे पत्र त्याला सतलज नदीवर २२ एप्रिल १७५९ त मिळाले (पत्रे व यादी ३६२ पैवस्ती). तेथून परत आल्यावर सुजाअतदौल्यावर स्वारी करण्याचा दत्ताजी व जनकोजी यांनी बेत केला व ते शुक्रतालास वैशाख शुद्ध १० शके १६८१ त ह्मणजे ६ मे १७५९ त आले ( भाऊसाहेवाची बखर पृष्ट ४७ ). तेथें नजीबखानाने त्यांना भाद्रपदमासपर्यत ह्मणजे आगस्ट-सप्टेंबरपर्यंत खेळविलें ( भाऊसाहेबाची बखर पृष्ठ ४८ ). तों इतक्यांत दसरा ( १ अक्टोबर १७५९ ) आला ( भाऊसाहेबाची बखर पृष्ठ ४९ ). नंतर कातिक शुद्ध प्रतिपदेस ( २२ आक्टोबर १७५९ ) दत्ताजी हरिद्वारास भागीरथीपार झाले ( भाऊसाहेबाची बखर पृष्ठ ५१ व लेखांक १४० ). १० नोव्हेंबर १७५९ रोजी सावाजी शिंदे दत्ताजीस सामील झाले (लेखांक १४३ ). तेव्हा अबदाली लाहोरास दाखल झाला होता (कित्ता). नंतर २४ डिसेंबर १७५९ च्या प्रातःकाळी अवदालीशी दत्ताजीचें झंज झालें ( लेखांक १४७ व भाऊसाहेबाची बखर पृष्ठ ५९). पुढे १० जानेवारी १७६० रोजी जनकोजी व दत्ताजी यांचं अबदालीशी बडाऊच्या घाटी दुसरें युद्ध झाले, त्यांत दत्ताजी रणांत पडले (लखाक १६५ ). जनकोजी पळाले ते कोटपुतळीस आले, तेथें मल्हारराव त्यांस भटल (लेखांक १५३, १२ जानेवारी १७६०). तेथून मंडळी सबळगडास आली, तेथें भागीरथीबाईस पुत्र ३ फेब्रुवारी १७६० ह्मणजे उदगीरची लढाई ज्या दिवशी झाली त्या दिवशी झाला (लेखांक १६२). इकडे गिलच्यांना पाठीवर घेऊन जनकोजी व मल्हारराव शिमगी पौर्णिमेपर्यंत धूम रंगण घालीत होते. त्यांच्यापैकी शेटियाजी खराडे व संताजी वाबळे यांस पुढे दोनच्यार दिवसांनी ह्मणजे ४ किंवा ५ मार्च १७६० च्या सुमारास अबदालीने गाठून मारून टाकिलें ( भाऊसाहेबाची बखर पृष्ठ ८३ व ऐतिहासिकलेखसंग्रह नंबर १७ व २० ). ह्याच सुमारास पेशव्याच बहाणपुरास ठाणे बसलें ( लेखांक १६७ व ऐतिहासिकलेखसंग्रह नंबर १४). ह्या वेळी मल्हारराव नरवर प्रांती होते ( ऐतिहासिकलेखसंग्रह नंबर १७). पुढे ऊन सोसत नाही ह्मणून अबदाली जयपूर प्रांतांतून माघारा अंतर्वेदीत गेला व मल्हारराव व जनकोजी शिंदे तेथेंच आसपास राहिले ( एतिहासिकलेखसग्रह १४, २२; एप्रिल,