पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/385

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दक्षिण मोकळी होती. असो. तिकडील वर्तमान वरचेवर आठा रोजाआड तुह्मी लिहीत जाणे. मामलियाचा ऐवज बाक़ी फार आहे. दहावीस लाख जरूर पाटवणे. चंद्र १ रजब. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [१६७] ॥श्री ।। ___ १५ मार्च १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणे. विशेष. तिकडे अबदालीची गडबड जाहाली यास्तव लौकर फौजा याव्या. त्यास मोगलावर जरब बसून मोगलाचा - २४४ भाऊसाहेबाच्या मनांत श्रीरंगपट्टणाला जाऊन तें हैदरच्या हातून काढावयाचे होते व कायमची सर्व दक्षण मोकळी करावयाची होती. २४५ ( अ ) अबदालीची गडबड हिंदुस्थानांत फार झाली यास्तव लवकर फौजा पाठवून द्या अशा अर्थाची पत्रे पेशव्यांस आली व ह्मणून विजयादशमीच्या मुहूर्ते ह्मणजे १ अक्टोबर १७५९ रोजी भाऊसाहेव डेरेदाखल झाले व रघुनाथराव घरी राहिले असें रा. नातू " महादजीच्या चरित्रांत” ( पृष्ठ ५६) लिहितात. कुमक घेऊन येण्याबद्दल निकडीची पत्रे आल्यावरून विजयादशमीला हिंदुस्थानांत जाण्यास पेशवे डेरेदाखल झाले हे मत होण्यास रा. नातूंना कारण येणेप्रमाणे झाले. गिलचे पाठीवर असतां शिंदेहोळकरांच्या फौजांनी शिकंदरशहरावर हल्ला १७५९ मार्चीत केला व नंतर होळकराचा पराजय होऊन सरदारांच्या फौजांनी जयपूर व केरौलीच्या आसपास तळ १७५९ च्या जूनांत दिला; त्या तळावरून सरदारांनी पेशव्यांस कुमकेबद्दल पत्रे पाठविली व ती पत्रं दसऱ्याच्या अगोदर महिना दीड महिना पोहोंचून हिंदुस्थानांत स्वारीला जाण्याचा पेशव्यांचा निश्चय झाला, असें रा. नातूंचें गणित आहे. परंतु शिकदरशहरावरती हल्ला शिंदेहोळकरांनी १७५९ माचीत केला नसून १७६० च्या पहिल्या मार्चाला केला व केरौलीच्या आसपास त्यांनी तळ दिला तो १७५९ च्या जूनांत नसून १७६० च्या एप्रिल-मेंत दिला: तेव्हां, पेशव्यांना कमकेस येण्याविषयींची पत्रे उदगीरची मोहीम होत असतां गेली हे खालील तारखांवरून समजून येईल.