पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/384

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बंदोबस्त करून दरमजल येऊन उदगिरीस मोगलास गांठले. पांच सात मजली पुढे चालिला. चंद्र १५ जमादिलाखरी चंडोलावर हल्ला करून मारून लटून फस्त केला. तेव्हां मोगल जेर होऊन जागीर व अशर, बहानपूर, दौलताबाद, विजापूर, मुल्हेर किल्ला याप्रमाणे तह केला. हे वर्तमान तुह्मांस कळावे यास्तव लिहिले असे. सारांश, मोगल फार तरतुदीने जुंझला. बहुता प्रकारे त्यास झुंझावयाची गांठ घालितां छातीचा कोट करून चंडोलावर फौजा उडवल्या. चारसा घटका तीर तरवार, गोळा गोळी, बाण, हात, धोंडा याप्रमाणे मारीत मारीत खासियाचे अंबारीपर्यंत मोकळा केला. कादरखान मातबर गाडद्याचा सरदार ठार झाला. शोकतजंग हत्तीसुद्धा धरून आणिला. त्यास जखम होती. तो मेला व सुरेव निरमळकर जखमी आहे. तोफा पंधरा व हत्ती आठ, अंबारी, हौदे निशाणाचे आले. सरकारचे मातबर बराणजी मोहिते व भगवतराव शिंदे व महादजी सालोखी व केशवराव पानशी व सखोजी घाटगे आणखी ठार झाले व जखमीहि झाले. तीर्थरूपाच्या पुण्यंकरून मोठी फत्ते झाली. या मुंजाने मोगलांत बाकी न रहातां साठ लक्षांची जागीर व सदरहूप्रमाणे स्थळे घेतली. याउपरि इकडील गुंता उरकला. चिरंजीव राजेश्री दादा फौजसुद्धा दरमजल त्या प्रांती यतील. + इकडे मुलुख स्थळे चांगली मिळाली, परंतु खर्च जाहला. कर्नाटकची स्वारी न झाली. तिकडेहि अबदालीचा पेच. पैका मिळायाचें झाले नाही. तिकडील पेचामुळे इकडे आटोपावे लागले. नाही तरी सारी २४२ ह्यावरून पेशव्यांच्या व निजामाच्या सैन्यांत कोणकोणत्या हत्यारांचा उपयोग होत असे हे दिसते. कित्येक नुसत्या हातानेच लढत. कित्येक गोफणीने धोंडे फेंकीत. कित्येक तिरकामट्याने तीर मारीत. कोणी नुसती तरवार चालवीत. कित्येक बाण फेंकीत व इभ्राईमखान गादी व केशवराव पानशी तोफा मारीत. ह्या असल्या गौडबंगाली सैन्याला इंग्रजांची कवायती पलटणें वाऱ्यासारखी उडवून देत ह्यांत कांहीं नवल नाही. २४३ ह्या सुरेरावांनी निजामाविरुद्ध नुकतेंच बंड केले होते.