पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/383

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५८ त्याप्रमाणे आहेत. मोठा नक्ष झाला. श्रीमंत नानासाहेब यांचे ताले शिकंदर आहेत. ज्याकडे वाईट नजरेने पाहतील त्याचे चूर्ण होईल. याजप्रमाणे मोगलाने दिले. आतां मोगलामध्ये होशा तिलतुल्य राहिला नाही. जहागीर कोणती घेतली त्याची याद आली नाही. मागाहून सविस्तर लिहून पाठवितो. नगरहून श्रीमंत नानासाहेब कूच करून गंगातीरास पैठणास फाल्गुन शुद्ध प्रतिपदेस जाणार. तिकडून श्रीमंत भाऊसाहेब येणार. गंगातीरास आलिया यांची त्यांची भेट सत्वरच होईल. भेट जाल्याउपरि श्रीमंत दादासाहेबाची रवानगी सत्वर तिकडे करणार यांत गुंता नाही. तूर्त फिकीर तिकडील यजमानास लागली आहे. पत्रं आलीं, वर्तमान कळल्या संतोष आहे. हबसी याजकडील उंदेरी घेतली. कासे यास आरमार लागली. तेहि सत्वर फडशांत गोष्ट आहे. मोगलाचा रेच उतरल्याने सर्वांचा माज मोडिला यांत गुंता नाही. वरकड वर्तमान मागाहून सविस्तर लिहून प॥. मिति माघ वद्य १४ शुक्रवार. हे विज्ञापना. श्रीमंतांस पत्र देऊन उत्तर घेऊन पाठविले आहे. र॥ शिंदे, होळकर यांस पत्रे सरकारी घेऊन पाठविली आहेत. प॥ हे विज्ञापना. पे। मित्ती चैत्र वद्य १२ सं. १८१६. [ १६६] ॥श्री ॥ १९ फेब्रुआरी १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसी:पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाही. तरी सविस्तर वरच्यावर लिहीत जाणे. इकडील वर्तमान तरी निजामआल्लीखानांनी जागीर व दोन किल्ले देऊ केले असतां मागे पुढे पाहू लागले. याजकरितां आमी बाहेर निघालो. फौज पाठवून नगरचा किल्ला घेतला. मागाहून आह्मीं नगरास येऊन तेथील