पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/382

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याजकडील चंडोल अगदी बुडविला. दहा अकरा हत्ती, पंधरा पावेतों तोफा आणिल्या. त्याजकडील याजखेरीज सात आठ मातबर सरदार मारिले गेले, गाडदी प्यादे यांस नीत नाही. याजप्रमाणे आह्मांकडील पांच सातजण केशवराव पानसी तोफखानेयाचे दरोगे, याजप्रमाणे पांच सात ठार. शंभर दीडशे राऊत तीन चारशे पावतों जखमी. याजप्रमाणे जालें. त्याजवर मोंगल तेथे राहिला. बरा नाही. आंत जखमी बहुत. मातबर चार असामी होत्या त्या मारिल्या गेल्या. यांजमुळे दहशत मोगलाने फार खादिली. उपाय नाही. आतां जर हे आपणांवर चालोन येतील आपणांस बुडवितील यांत गुंता नाही. याजप्रमाणे अंधेशा पुरता चित्तीं आणऊन सल्ल्यावर घातलें, मोगलाने. त्याजवर त्यांनी त्यास जागा मनास येईल त्याप्रमाणे किल्ले जागा मागितली. त्याजवर त्याणे यास बजित फार येऊन दिली. साठी लाखाची जागा स्वदेशी अंबेड, पुलंबारी, नांदेड याजप्रमाणे खास जागीर द्यावी; किल्ले दोन, आसेरी, दवलताबाज, शहरें दोन, विजापूर, बराणपूर, याजप्रमाणे घेऊन सलुख झाला. दवलताबाजेस र॥ गोपाळराव गोविंद गेले. आसेरीस रा. बच्याजी विश्वनाथ बरवे; विजापुरास नागोराम वामोरीस असतात ते; असे रवाना झाले. किल्ले हस्तगत झाले ह्मणजे मोगलाने कूच करावें. जेथे आहे तेथून निजामअल्ली याणे आलजपुरास जावं. जागा खाऊन असावें. सलाबतजंग यांणी भागानगरी असावे. मराठे निंबाळकर यांणी त्याजकडे जाऊ नये चाकरीस. याजप्रमाणे करार झाला. कही मोगलाची मोकळी मात्र झाली. आपली फौज ज्याप्रमाणे आहेत भोवताली २४१ ह्या तहाप्रमाणे, अशेर, दवलताबाद, सोल्हर, मुल्हेर, नगर आणि ब-हाणपूर असे सहा किल्ले मिळाले. पैकी नगरचा किल्ला पेशव्यांनी अगोदरच घेतला होता. ग्रांटडफ शिवनेर ह्मणून ह्मणतो ती चूक आहे. अंबेड, फुलंबरी, नांदेड आणि विजापूर हे प्रांत जागीर मिळाले. ग्रांटडफच्या मुख्य लिहिण्यांत ब-हाणपूर नाही. बाकी टीत 'बुलंदी ब-हाणपूर ' ह्मणून यादीत ह्या शहराचा समावेश त्याने केला आहे. ही कायमची कलमें अंमलांत येईतोपर्यंत कांहीं जुजबी अटी घातल्या होत्या. त्या पत्रांत पुढे दिल्या आहेत.