पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/381

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५६ सविस्तर सेवेसी लिहिले होते. अलीकडील वर्तमान तर मोगलास उदगिरीस नजीक बेदर येथें गांठ श्रीमंताची पडली. तेथें युद्ध जाहले. परंतु ते माफक. त्याजवर मोंगल आवशास आला. वाटेस युद्ध होत आला. आवशाहून धारूरास येणार. वीस कोस आवशाहून धारूर. त्यास तीन मुकाम, दाहा कोस मोंगल आला. धारुरास र॥ व्यंकटराव निंबाळकर, लक्षुमणजी खंडागळे व आणखी काही मराठे ऐसी सात आठ हजार फौज जमा झाली. ते सामील करून घ्यावी याजकरितां मोंगल चालिला. तों श्रीमंत भाऊसाहेब, दादासाहेब यांणी मनसुबा केला जे दहा कोस धारूर राहिलें. धारूरास गेला, मराठे मिळाले ह्मणजे विचार पडेल, हे उत्तम नाहीं. ते करार झाला. माघ वद्य २ द्वितीयेस रविवारी मोंगलाचे कुच आहे. युद्ध उत्तम करावें; मरेल तो मरो. याप्रमाणे मातबर सरदार होते, त्यांशी सर्वांहीं करार याजप्रमाणे केला. त्याप्रमाणे प्रातःकाळी कुच जाहलें. दोन प्रहरां मुकामास न येतां नळावर आध कोसांवर मोगल आवळून राहिला. आह्मांकडील तोफ लागली. त्याजवर दोन प्रहरी युद्ध जाहले दाराला तरी कळली असती. पुरुषोत्तमपंताचे पत्र युद्ध झाल्यावर पांच दिवसांनी लिहिले आहे. तो खुद्द सैन्यांत किंवा त्याच्या आसपास होता असें वर " आपले फौजेशी” ह्या प्रयोगावरून दिसते. तोहि पाटील रणांत राहिले एवढेच लिहितो. त्यामागून उज्जनीहून दुसरे एक पत्र आले त्यांत पेंढारी पाटिलवावांना जिवंत लष्करांत घेऊन आले असे लिहिले होते. ह्या चारी पत्रांत शिर कापल्याचा मुळीच उल्लेख नाही. तेव्हां बखरीत जे हृदयद्रावक वर्णन केले आहे तें शुद्ध काल्पनिक आहे अशी बळकट शंका येते. तशांत बखरीत राजाराम चोपदाराचे कुतुबशाशी जे भाषण लिहिले आहे तेंहि थोडेसें नाटकी, अप्रासंगिक, व ह्मणून साक्षात् घडलेले नसावे, असे दिसते. भाऊसाहेबांची बखर लिहिणाऱ्याला खुलवून लिहिण्याची चटक लागल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. १७५२ पासून १७६१ पर्यत हिंदुस्थानांत ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या त्या त्याला चांगल्या माहीत होत्या. त्या त्याने जशाच्या तशाच दिल्या असत्या आणि तिखट मीठ लावून झणझणीत करण्याचा प्रयत्न केला नसता ह्मणजे मोठी बहार झाली असती. २४० ३फेब्रुवारी १७६० अगर १५ जमादिलाखर, सु॥ सीतैन (लेखांक १६६, पत्रे व यादी १७०). पत्रे व यादींतील १७० हे पत्र १७५९ त लिहिले असा काव्येतिहासकारांचा आशय दिसतो. परंतु तो चुकीचा आहे.