पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/380

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५५ गोदर चवदावे रोजी दिल्लीहून सावकारी शहरास आले, याजप्रमाणे. शिंदेयांशी लढाई जाली. पाटील युद्धांत गोळी लागून राहिले. याजप्रमाणे उज्नेनहून गोविंद विश्वासराव यांची पत्रे साडेसा रोजांची आली उज्जेनहून. त्या मागून उज्जेनहून दुसरे पत्र आले की रणांत पाटीलबुवा राहिले. आपले फौजेचा भणाण जाहला. मग पेंढारी रण सोधावयास गेले. अबदाली दिल्लीत गेला. त्यांणी रण सोधिलें तो पाटीलबुवा रणांत जीवंत सांपडले. पेंढारी उचलून लष्करांत घेऊन आले. याजप्रमाणे उज्जेनहून पत्रे आली. आपली फौज पळाली ते कोटपुतळीनजीक सांवर धरून र॥ जनकोजीबावा मुक्काम करून राहिले. बुनगे सडे हत्ती उंटें राहिली. लुटिली गेली. तो मुकाम मजकुरीं ॥ मल्हारजीबावा होळकर फौजसुद्धा आले. उदईक भेटी होतील ह्मणून पत्रं वकीलांची उज्जेनीचे पत्रांत भेटले. अबदाली याणे तेमूरपातशा बसविला, त्याची दोही फिरविली, गाजुद्दीखान लष्करी आले, त्याजबराबर पातशाहाजादा आले, याजप्रमाणे यथें वर्तमाने आली. परंतु तेथून कोणाचें पत्र आले नाही. त्यावरून यजमान फार अमी. आपली पत्रे रोज जलद येतात. या दिवसांत पत्र यावी ते येत नाहीत. काय विचार आहे हा न कळे. ऐसियास, वडिली सविस्तर वर्तमान लिहून पाठविणे. सविस्तर जरूर जलद वर्तमान लिहून पाठवणे. मजला फार चिंता लागली आहे. वडील तेथे होते. परंतु बुनगेयांत होते. ते चाकरी वडिलास सांगितली आहे ह्मणून पत्रे येथे वकिलांची आली होती. सविस्तर लिहून पाठवावयास आज्ञा करावी. देशाकडील वर्तमान तर मोगलाशी बिघाड जाहला होता तें वर्तमान - २३८ सरकारी बातमीपेक्षां सावकारी बातमी जलद येत असे. २३९ (१) पाटीलबोवा रणांत राहिले. (२) पाटीलबोवा रणांत जिवंत राहिले व त्यांना बुणग्यांनी परत आणिलें. (३) पाटीलबोवांचे शीर कुतुबशाने कापून नेले व धड तसेंच रणांत ठेविलें ( भाऊसाहेबाची बखर पृष्ट ६९), ह्यांपैकी खरी बातमी कोणती? दिल्लीच्या सावकारी पत्रांत, पुरुषोत्तमपंताचे पत्रांत व गोविंद विश्वासरावाचे उज्जनीचे पत्रांत पाटील रणांत राहिले, असा मजकूर आहे. बखरीत लिहिल्याप्रमाणे दत्ताजीचें शीर भर रणांत कुतुबशाने कापून नेले असते तर ती बातमी निदान दिल्लीच्या बातमी