पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/379

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५४ यांचेच फौजेशी युद्ध जाहलें ? तें तपशीलवार लेहून पाठविणे. प्रस्तुत सरदार मनसुबा काय करितात ? व अबदाली कोठे आहे ? काय मनसुबा करितो, ते बातमी येतच असेल. सविस्तर लिहिणे. या दिवसांत तुह्मीं जलद जलद वर्तमान लिहीत जाणे. जाणिजे. छ २६ जमादिलाखर, सु॥ सितैन मय्या व अल्लफ. + इकडील मोगल मारल्यादाखल करून पंचेताळिसाँची जागीर, बराणपुर, अशेर, दौलताबाद घेतली. गुंता उरकला. याउपर सत्वर फौजा पोहोचल्या. जाणिजे. मल्हारबांनी जाट, मनसुरअल्लीचा लेक लगामी राखावा. बाजी राखावी. हे विनंति. [१६५7 ॥ श्री॥ १५ फेब्रुवारी १७६०. तीर्थस्वरूप राजश्री गोविंदपंत दादा वडिलांचे सेवेमीः अपत्ये बाबूराव दोनी कर जोडून शिरसाष्टांग नमस्कार विनंति तागायत माघ वद्य १४ पावेतों मुक्काम अमदानगर येथे लष्करांत यजमानापाशी सुखरूप असो. विशेष. वडिलांची पत्रे दक्षणी मित्तीची पौष वद्य ७ सप्तमीची आली ते येथे माघ शुद्ध १० दशमीस पावली. पत्रार्थ आज्ञेप्रमाणे करून सरकारी पत्रं सरकारांत दिली. त्यांत मजकूर उदईक शिंदे यांजशी व अबदाली याजशी युद्ध प्रसंग आहे याजप्रमाणे वर्तमान. त्यास, छ २०१७ विसावे जमादिलावलीं ||बडाऊच्या घाटीं अबदालीशी आपले फौजेशी युद्ध जाहले. रा० पाटीलबावांस मानेवर गोळी लागली. रणांत राहिले. ह्मणून पत्रे छ २५ जमादिलावलीची पुरुषोत्तमपंत याची आली. हेच वर्तमान अ २३६ तह होत असतांना हे पत्र लिहिले आहे. निजामाने जेवढे प्रथम कबूल केलें तेवढे येथे लिहिले आहे. २३७ १०जानेवारी १७६०, पौषवद्य ८. || ' बराऊ' (नातूकृत महादजीचे चरित्र पृष्ठ ३०१).