पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/378

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५३ [१६३ ] ॥श्री॥ ८ फेब्रुआरी १७६०. श्रीमंतराजश्री भाऊसाहेबांचे सेवेसीः श्री सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्यआज्ञाधारक संताजी वाघ दंडवत विज्ञापना येथील कुशल तागाईत माघ वद्य सप्तमी पावेतों साहेबाचे कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण आजच हिंदुस्थानचे स्वारीस सुमुहूर्ते निघून डेरियास आलो. याउपरि मजलदरमजल तीर्थस्वरूप राजश्री मामाजवळ फौजसुद्धा जाऊन दाखल होतो. आमांस सर्वस्वे आश्रा स्वामीचे पायाचा आहे. पूर्वीपासून एकनिष्ठ सेवकव्रत मात्र जाणत आहों. सर्व निर्वाह करणार धनी समर्थ आहेत. वरकड वर्तमान राजश्री हरि वल्लभ यांनी विज्ञापनापत्र लिहिले आहे, त्यावरून विदित होईल. कृपाळू होऊन पत्राचे उत्तर आज्ञापत्र पाठवावें. बहुत काय लिहिणे. कृपा कीजे. हे विज्ञापना. पे॥ छ २१ जमादिलाखर. - - - ॥ श्री॥ १४ फेब्रुआरी १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोण्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. “अबदाली नजीबखानाकडे जाऊन त्यास व पारच्या रोहिल्यास मेळवून घेऊन दिल्लीच्या रोखें आला. उद्या परवा मुकाबला होईल." ह्मणोन लिहिलें तें कळले. बहुधा मुकाबला जाला असेल. परस्परें मुकाबला जाल्याचे वर्तमान येते. परंतु तुह्मीं कांहींच लिहिले नाही, हे कोण गोष्ट ! लडाई कसकशी जाली ? राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री जनकोजी शिंदे व दत्ताजी शिंदे येकत्र होऊन युद्ध जालें किंवा जनकोजी शिंदे