पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/377

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५२ राजश्री भाऊ व दादा व राव गेले. उदगिरीसमीप गांठ पडून युद्ध झाले. त्यास नरम केलें. इकडील निर्गम सत्वरच होईल. चिरंजीव राजश्री दादा तिकडे अविलंबेंच येतील. + जरूर आधीं अबदालीवर जावें. ते काम नीट जाहालिया सहजांत जयनगरचें (व) गैरे काम होईल. छ ११ जमादिलाखर. बहुत काय लिहिणे. हे आशीर्वाद. ॥श्री॥ ४ फेब्रुवारी १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दन पंत स्वामीचे सेवेसीः पोण्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ फाल्गुन वद्य ३ मुक्काम नजीक संबलगड जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. आह्मी कबिले बुनगे पावावयास आलो. तें संबलगडाजवळच चमेल उतरून पाविले. काली फाल्गुन वद्य ३ रविदारी मध्यरात्री राजश्री दत्ताजी शिंदे यांस पुत्र जाहला. उत्साहाकरितां आज मुक्काम केला. उदयिक पंचमीस कूच करून दरमजलींनी येतो. वरकड भेटीनंतर सविस्तर बोलोन. फार श्रम जाहले. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. पे॥ फाल्गुन वद्य १२. -


२३५ दत्ताजीची स्त्री भागीरथीवाई ईस पुत्र फाल्गुन वद्य ३ रविवारी मध्यरात्री ह्मणजे ३ फेब्रुवारी १७६० रोजी झाला. दत्ताजी १० जानेवारी १७६० रोजी वारला (लेखांक १६५). तेव्हां दत्ताजीच्या मृत्यूनंतर पंचविसाव्या दिवशी दत्ताजीस पुत्र झाला. दत्ताजीच्या दहाव्या दिवशी बुणगे चमेलीवर आले; तेथून निघून कुवारी नदीवर त्यांनी तेरावा केला व पुढें पांच दिवसांनी कुच केलें, असें भाऊसाहेबाच्या बखरी ( पृष्ठ ८०) त झटले आहे. परंतु तें चूक आहे. तेराव्या दिवशी उत्सव करितां आला नसता व साखराहि वांटण्यास हरकत येती. वाचकांना गहिवर यावा एतदर्थ भाऊसाहे बाची बखर रचणाऱ्याने येथे स्वतःच्या कल्पनेतील कादंवरीचा अंश मिश्रित केला आहे हे उघड आहे.