पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/376

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यंकटराव निंबाळकर यांस सामील करावें, तदोत्तर जानोजी निंबाळकर यांसहि मेळवावें, ऐशा मजकुरांत आहे. परंतु धारुराअलीकडे येऊ देत नाही. तेथेच गुंता उरकेल ऐसे दिसते. त्याजपाशी फौज बारा हजार आहे. गारदी दाहा हजार आहेत. तोफा शंभर आहेत. येणेप्रमाणे सरंजाम आहे. सरकारी सामान भारी आहे. चाळीस हजार फौज आहे. महिना पंधरा रोजांत गुंता वारला तर फौजा तिकडे येतील. नाहीं तरी मग फौजा अखेर साली येत नाहीत. श्रीमंत राजश्री भाऊसाहब व दादासाहेब यांचे पत्रांची उत्तरें आणवून पाठविली आहेत. +बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विज्ञापना. पै॥ चैत्र वद्यु ३, मु॥ ग्वालेर. [१६१] ॥ श्री ॥ ३० जानुआरी १७६०. राजश्री मल्हारजी होळकर गोसावी यासिः सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत असले पाहिजे. विशेष. राजश्री दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे अबदालीवर गेले. त्यांची यांची गांठ पडून युद्ध जालें. ह्मणोन वर्तमान आले. आपणांस हि वारंवार पत्रे पाठविली. अबदालीचें पारपत्य आधीं करावें. माधोसिंगाचा मजकूर आपणांस अगाध नाही. जेसमयीं चित्तावर धराल तेसमयीं कराल. तर लौकर जावें ह्मणोन लिहिले होते. बहुधा आपण गेलेच असतील. उभयतां एकत्र होऊन अबदालीस हतप्रभाव केल्याचे वर्तमान सत्वर ल्याहावें. इकडे निजामअल्लीखानांनी बिघाड केला. त्याजवर चिरंजीव २३४ हे पत्र गोविंदपंतास ग्वालेरीस पोहोंचले. शिंदे होळकरांचा पराभव झाल्यावर स्वारी ग्वालेगस येऊन बसली. फडणिसांना भेटण्यास इटाव्यास गेली नाही. पत्र ४ मार्च १७६० रोजी पोहोंचलें.