पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/375

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. २५० सविस्तर वर्तमान कळलें. अबदाली अंतरवेदीत आला, दंगा भारी आहे, ह्मणोन लिहिले. त्यास, श्रीमंतांची पत्रे प्रविष्ट करून उत्तरें घेऊन पाठविली आहेत. राजश्री मल्हारजी होळकर येऊन सामील जाहलेच असतील. त्यांची पत्रे काल श्रीमंतांस आली की आपण जलदीने निघोन शिंदेयांकडे गेलों ह्मणून त्यांनी लिहिले होते. ते आले असतील. उभयतां येकत्र जालिया अबदालीचें पारपत्य करितील, यांत गुंता नाही. देशीहून फौज पाठविणे ह्मणोन आपण श्रीमंतांस लिहिले. त्यास, तूर्त मोगलाचे शहास गुंतले आहेत. उदगिरीचे अलीकडे साहा कोसांवर मोगल आहे. त्यास, श्रीमंत राजश्री भाऊसाहेब चौगीर्द फौजा बसवून उतरले आहेत. माघ शुद्ध प्रतिपदेस व द्वितीयेस ऐशी दोन रोज दोन युद्धहि जाली. इभ्राहीमखान गारदी पहिला निजामअल्लीकडे होता तो तेथून सोडून येऊन सरकारांत चाकर राहिला आहे. त्याने प्रथम तोंड लाविले. व आणखी पतकेंहि दाहापांच कुमकेस होती. युद्धप्रसंग बराच जाहाला. त्यास, मोंगलाकडील दोन तीन सरदार मातबर पडले. रेणकोदास ह्मणोन पांच हजार फौजेचा सरदार होता तो कामास आला. व आणखी बरेंच माणूस दोन च्यार पडले. गारदी दोनशे अडीचशे पावेतों मारिले. तीन हत्ती तोफांचे गोळ्याने वारले. सरकारचे गारदी पंचवीस पन्नास मेले व शेपन्नास जखमी जाहले. शेपन्नास घोडेहि जखमी जाहले. त्याजवरी खाविंदाचा रोख धारूरचा आहे. धारुरास आलाच असेल. सरकारच्या फौजा चौगीर्द चालतात. दाणावैरण त्यांस मिळों देत नाही. त्याचे लष्करांत दाणावैरणीचा आकांत आहे. दाणे पांच शेर जाले आहेत. लोकरीच गुंता उरकावा सारखा आहे. त्याचा मजकूर मराठे कोणी सामील जाहले नाही. त्यास, जाधवराव मात्र सामील जाहले आहेत. धारुरास येऊन २३३ १६.व २० जानेवारी १७६० पहिली दोन युद्धे झाली. नंतर धारूराच्या अलीकडे शेवटले उदगीर येथील युद्ध झाले. इभ्राईमखानाचा मोड होऊन त्याची ११ निशाणे गेली ह्मणून काव्येतिहाससंग्रहकार ( भाऊसाहेबाची कैफियत पृष्ठ ४ टीप ) ह्मणतात ते हे युद्ध नसून शेवटलें युद्ध आहे.