पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/374

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४९ | १५९] ॥श्री ॥ ३० जानुआरी १७६०. राजश्री दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे गोसावी यांसिः सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य ते॥ बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असले पाहिजे. विशेष. तुमची व अबदालीची गांठ पडून युद्ध झालें ह्मणून परस्परें वर्तमान येते. परंतु तुमचे पत्र येऊन साद्यंत वर्तमान कळत नाही. अबदालीपाशीं फौज किती आहे ? त्याचा जोरा कसा आहे ? तुझी कोणे जागा आहां ? व अबदाली कोठे ? त्याचा कस्त कसा आहे ? राजश्री मल्हारजी होळकर यांस वारंवार पत्रे पाठविली की तुह्मांस जाऊन सामील होणे. बहुधा ते तुह्मांजवळ पावलेच असतील. तरी सविस्तर वर्तमान लिहिणे. इकडील वर्तमान तर निजामअल्लीखानांनी बिघाड केला. त्याचे पारपत्यास चिरंजीव राजश्री भाऊ व दादा व राव गेले. एक दोन युद्धे झाली. त्यास नरम करणें तें केलें. हा गुंता सत्वरच उरकतो. चिरंजीव राजश्री दादा अविलंबेंच त्या प्रांतें येतील. तुझीं तिकडील वर्तमान वरचेवर लिहीत जाणे. अबदालीच्या पराजयाचें वर्तमान सत्वर लिहावें. + प्रथम तजविजीने संभाळून काम करावें. जातीनशीं जाया होऊ नये. सरदारीने काम करावं. ईश्वर यश देईल. छ ११ जमादिलाखर. बहुत काय लिहिणे. हे आशीर्वाद. [१६०] ॥श्री॥ ३० जानुआरी १७६०. तीर्थस्वरूप राजश्री गोविंदपंत दादा वडिलांचे सेवेसीः अपत्ये बाबूराव साष्टांग नमस्कार विनंति तागाईत माघ शुद्ध ॥१३ औमवार, मु॥ अमदानगर, वर्तमान यथास्थित असे. विशेष. वडिली पत्रे पाठविली ती प्र॥ होऊन २३२ हे नानासाहेबांच्या राजनीतीच्या धोरणाचे प्रथम सूत्र आहे. || मोडकांच्या जंत्रीत माघ शु॥ १३ ला बुधवार आहे.