पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/373

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४८ आहे. तोफा मारितात. दर रोज त्यांचे हत्तीवरील सरदार पडतात श्रीकृपेनें सत्वरच मोगला पारपत्य होईल. हे काम होतांच तिकडे फौज रवाना होईल. मल्हारबास वारंवार पत्रे रवाना केली आहेत. परंतु त्याचे प्रकृतीस तुह्मी जाणता. या दिवसांत दत्तबाकडील वर्तमान जरूर जलद कळले पाहिजे. जलद वर्तमान तिकडील सर्व लिहीत जाणे. मनसूरअल्लीचे लेकाचे घरचे कच्चें वर्तमान लहान मोठे सर्व आणून लिहिणे. श्रीकृपेनें फाल्गुनअखेर येथील काम होईल. तदोत्तर बहुत फौज हिंदुस्थानांत रवाना होईल. उंदेरी घेतली. कासाही घेतला. मग जंजिरा हातपाय मोडले. यंदा दाहीकडे कलह एकदांच प्राप्त आहे. श्रीकृपेनें उत्तमच होईल. काशीचा गुलाबसाखरकंदाची गैर जरूराती. उत्तम फर्मास जरूर रवाना करणे. सांप्रत आमचे शरीरप्रकृत उत्तम आहे. छ १० जमादिलाखर. हे विनंति. हा प्रयत्न कार्तिक शुद्धांत झाला असें कैफियतीचें ह्मणणे आहे ते मात्र चूक आहे. कारण मुजफरखान अर्धा कार्तिक महिना कोंकणांत होता असे पत्रे व यादी ९६ ह्यांतील मजकुरावरून सिद्ध करितां येईल. हे पत्र १३ रबिलावल सन सीतैनाला रवाना केले आहे. ह्या पत्रांत १४ रबिलावली महादाजी केशव याजकडून पत्र आले ते पावले असे लिहिले आहे. परंतु पत्र १३ रबिलावली रवाना केले असल्यामुळे १४ रबिलावलचा त्यांत वृत्तांत येणे अशक्य आहे. १४ रबिलावलच्या बद्दल १२ रबिलावल असें वास्तविक पाहिजे आहे. तसेंच १४ रबिलावल शनवार ह्मणून तेथे लिहिले आहे. परंतु १४ रबिलावली सोमवार आहे. १२ रबिलावली शनवार पडतो. तेव्हां १४ रबिलावलाच्या बद्दल १२ लिहिले आहे; परंतु तो लेखकाचा हस्तदोष आहे. ह्या १३ रबिलावलच्या ह्मणजे ४ नोव्हेंबर १७५९ च्या पत्रांत मुजफरखान कोंकणांत कोळ्यांचे बंड मोडीत होता ह्मणून लिहिले आहे. तेव्हां भाऊसाहेबावर मुजफरखानाने मारेकरी घातले ते ४ नोव्हेंबरच्या नंतर घातले असावे हे निर्विवाद आहे. ह्याच चार नोव्हेंबरच्या नंतर इभ्राइमखान फुटून आला असावा. तो येणार हे पकें समजल्यावर मुजफरखानानें आपला निंद्य हेतू तडीस नेण्याचा प्रयत्न केला असावा. हा मारेकरी घालण्याचा प्रकार पुणे येथे घडला असल्यास भाऊ नोव्हेंबर महिन्यांत पुणे येथे होते, दसऱ्याला सुमुहूर्ताने बाहेर मात्र पडले व तेथूनच निजामाशी बोलणे व इतर कारभार करीत होते असें उघड ठरतें.