पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/372

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४७ तें करणे. शामलाचें असाध्य स्थल उंदेरी, समुद्रांतील जागा, अरमार व लोकांनी मेहनत करून चंद्र २९ जमादिलावलीं फत्ते करून जंजिरा काशावर गेले. तिकडील धर सुटला आहे. +तेंहि कार्य व्हावेसे आहे. चंद्र १० जमादिलाखर. हे विनंति. [१५८] ॥श्री॥ २९ जानुआरी १७६०. पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः नमस्कार विनंति उपरि. अबदाली जवळ आला. दत्तबा सडे होऊन गेले. यंदा अबदाली भारी आहे. बहुत तिकडे मिळाले आहेत. सत्वर फौज दहा हजार रवाना करावी. जमीदार सर्व फिसादीवर आहेत. ह्मणून विस्तारें लिहिलें तें अवगत जाहालें. तिकडे फौज पाठवणे जरूर आहे. परंतु निजामअल्लीसी जॅझ प्रारंभ जाहाल्यास पंधरा दिवस जाहाले. मोंगल थोडा आहे. सरकारची फौज चाळीस हजार जमा जाहाली. इभ्रामखान त्याकडील मातबर गाडद्याचा सरदार तिकडून फुटन आला. यंदा गाडदी बारा हजार २३० उदेरी १९ जानेवारी १७६० त घेतली. हे स्थल घेण्याकरितां पेशवे वर्षदीडवर्ष खटपट करीत होते ( पत्रे व यादी ८३ । ७६।३७९ ). उंदेरी, कासें इत्यादि स्थलें मुंबईभोंवती आहेत. . २३१ इभ्राइमखानाला सलाबतजंगाने काढून टाकिलें असें ग्रांटडफ ह्मणतो. परंतु तो फुटून आला असें ह्या पत्रांत लिहिले आहे. आतां तो फुटून कधी आला? प्रांटडफच्या मते ह्या वर्षाच्या मुलुखगिरीस प्रारंभ व्हावयाच्या अगोदर ह्मणजे १ अक्टोबर १७५९ च्या अगोदर त्याला पेशव्यांनी नौकरीस ठेविलें. तेव्हां मुजफरखान ह्मणून जो पेशव्यांच्या पदरी गार्याचा नाईक असे त्याला ती गोष्ट बरी वाटेना. ह्मणून त्याने भाऊसाहेबाचा खून करण्याचा प्रयत्न केला व हा सर्व प्रकार ह्या मुलुखगिरीच्या अगोदर घडला. परंतु “ फुटून आला" असें ज्याअर्थी बाळाजी बाजीरावाने शब्द लिहिले आहेत त्याअर्थी हे फुटणे दोन्ही सैन्यांची हालचाल होऊ लागल्यावर झाले असावे असा तर्क आहे. मुजफरखानाने भाऊसाहेबाला मारण्याचा प्रयत्न केला तो दसऱ्यानंतर केला असें भाऊसाहेबांच्या कैफियतींत पटलें आहे.,