पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/371

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४६ धरून अंतरवेदींतून दिल्लीस यावें, नजीबखानास सामील करून घ्यावे, असा त्याणी विचार केला. नजीबखानहि त्यास येऊन सामील जाला. सरदार त्यास घेरून आहेत. तथापि तो भारी. स्वामींनी राजश्री मल्हारजीबावा, पत्र पाठवून ते, लौकर येत तें करावें व दहा हजार फौज एक सरदार साळसुद मुलूख कौली न लुटी ऐसा ग्वालेरेसमीप पाठवावा. जमीदारांनी हरामजादगी केली. ऐन हंगामींच बखेडा जाला ह्मणोन विस्तारे लिहिलें तें कळलें. ऐशास अबदाली आला. याजकरितां राजश्री दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे रोहिल्याचा कारभार ठेऊन गेले. तेच समयीं राजश्री मल्हारजी होळकर यांसहि सामील करून जावयाचे होते. ते न केले. मल्हारबांनी आधीं काम कोणतें करावें ? मग कोणतें करावें ? माधोसिंगाचा मजकूर काय ? जेव्हां झटले तेव्हां पारपत्य होते. तो विचार त्यांनी न केला. दत्तबा तो इश्वराचे घरचे शिपाई ! त्यास अबदलीची तमा काय ? जाऊन गांठ घातली. ते त्यास सोडतील ऐसें नाहीं. मल्हारबास वारंवार जावयाविशीं पत्र पाठविली. बहुतकरून मल्हारला जाऊन सामील जालेच असतील, प्रस्तुतहि त्यास पत्र पाठविले आहे व दत्तबासहि पत्र पाठविलें असे. तें त्यास देणे. अबदालीचें पारपत्य करावयाविशीं मनःपूर्वक तुझी सर्व मेहनत करीत असालच. करावी. दहा हजार फौज पाठवावयाविशी लिहिले. तरी इकडे निजामअल्लीखानांनी बिघाड केला. त्याजवरी चिरंजीव राजश्री भाऊ व दादा व राव गेले. उदगिरीसमीप गांठ पडली. एक दोन जुझें चांगली जाली. त्याच्या गटांत गोळे चालविले. एक दोन हत्तीनिशी ठार व एक हत्ती ठार जाला. मोगल नरम जालाच आहे. हा गुंता सत्वरच वारतो. चिरंजीव राजश्री दादासच अविलंबे रवाना करून. तुहीं तिकडील वर्तमान वरच्यावर लिहीत जाणे. च्यार दिवस अधिक आगळे दादासाहेबास लागले तर फौज दाहा हजार त्वरेनेंच पाठवितों. तुझी आपले कमाविसदारांस वरकडास लेहून खबरदारीने राहात, जमीदार लबाडीवर येऊ न पावत