पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/370

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४५ वारंवार जावयाविषयी पत्रे पाठविली. बहुधा गेलेच असतील. तुझी सर्वानी येकचित्तें करून मेहनत करून अबदालीचें पारपत्य करून अटकपार करावा हे सर्वात्कर्ष उत्तम आहे. + जरूर आधीं जावें. जयनगरचे जेव्हां हटलें तैसें होईल. छ १० जमादिलाखर. हे विनंति. [१५७] ॥श्री ॥ २९ जानुआरी १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासीः पोण्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. तुहीं दोन पत्रे एक पौष वद्य ३० दुसरें पौष शुद्ध ७ कुंजपुरचे मुक्कामचे पाठविलें तें माघ शुद्ध १० प्रविष्ट जाहालें. अबदाली तीस पसतीस हजार फौजेनिशी चालोन आला. याजकरितां नजीबखानाचा मुकदीमा तैंच ठेऊन सरदार व वजीर अबदालीवर चालोन गेले. समागमें आह्मांसहि आणिलें. पौष शुद्ध ५ पंचमीस गांठ पडली. युद्ध जालें. वजीर व राजेश्री जनकोजी शिंदे बुनगेसहित मागें राहिले. राजश्री दत्ताजी शिंदे सडे होऊन गांठ घातली. त्यास अबदालीची फौज भारी; तथापि दत्ताजीबावांनी बरे वैजैनें नरम केले. त्यांनी डांगर २२७ मल्हारराव ह्यावेळी जयनगर ऊर्फ जयपूर प्रांती होते किंवा नाही ह्याचा संशय ग्रांटडफ्ला आला होता. परंतु तो जयनगर प्रांतीच होता ह्याचा उल्लेख लेखांक ४१,५५ व ५९ ह्यांत हवा तितका केला आहे. । २२८ ह्यावरून नजीबखानाशी सलूखाचे ह्मणण्यासारखे काहीच बोलणे झाले नाही असे दिसते. अबदालीच्या येण्याच्या अगोदर नजीबाला पुरता चोपला पाहिजे होता. परंतु गोविंदपंतांसारख्यांकडे नजीवाची व सुजाउदवल्याची राजकारणे असल्याकारणाने (लेखांक ३७) विलंब होऊन मराठे ह्यावेळी दोन शहांच्या मध्ये सांपडले. २२९ ही लढाई २४ डिसेंबर १७५९ रोजी झाली. ती बरें वजने झाली ह्मणून पेशव्यांना बातमी दोन तीन ठिकाणाहून आली. तेव्हां भाऊसाहेबांच्या बखरीत (पृष्ठ ६० । ६१) “ मराठ्यांची तोंडे काळी खापरासारखी दिसों लागली " ह्मणून हटले आहे ते ग्राह्य दिसत नाही.