पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/369

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४४ करून याचा पराजय होईल ह्मणोन विस्तारें लिहिले. परस्पर वर्तमान आलें की अबदालीसी सरदारांसी मुकाबला होऊन लढाई बरें वजनें समशेरासमशेर जाहली आणि तुह्मीं कांहींच लिहिलें नाहीं ! तरी सविस्तर वर्तमान जलद लिहीत जाणे. अबदालीचे फौजेचे बळाबळ कसे आहे ? फौज कशी आहे? सरदार परम धीर्येवान मर्द पराक्रमी आहेत. ते हिमतीस, बहादुरीस चुकतील असा अर्थ नाहीं. अबदालीस हतप्रभाव करावयाच्याच प्रयत्नांत, मनसुबियांत असतील. राजश्री मल्हारजी होळकर येऊन सामील जाहले न जाहले ते लिहणे. प्रस्तुत सरदार कोठे व अबदालीची फौज कोठे आहे ? तो काय विचारावर आहे ? तें वर्तमान या दिवसांत जलद जलद आपल्याकडील देखील वर्तमान लिहीत जाणे. जाणिजे. छ ४ जमादिलाखर सु॥ सितैन मय्या व अल्लफ. + बहुत काय लिहिणे, या दिवसांत जलद वर्तमान लिहीत जाणे. हे विनंति. [१५६] ॥ श्री॥ २९ जानुआरी १७६०. राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गंगाधर यशवंत स्वामी गोसावी यांसिः पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. राजश्री दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे याची व अबदालीची गांठ पडून येक दोन युद्धे झाली ह्मणोन वर्तमान आले. राजश्री मल्हारबासहि वर्तमान आलेच असेल. मल्हारबास २२६ " लढाई बरे वजने झाली” ती पौष शुद्ध ५, २४ डिसेंबर १७५९ रोजी झाली. पौष वद्य ४ ला सरदारांची व अबदालीची संनिधता झाली. लढाई होण्यास अवकाश होता. + येथपासून खुद्द खाशांचे अक्षर आहे. ह्या पत्रापासून पुढे जेथे + अशी खूण लागेल तेथपासून पुढचा मजकूर खुद्द खाशांच्या हातचा आहे असे समजावे.