पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/368

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४३ प्रकार कसा आहे तें विस्तारें वरच्यावर लिहीत जाणे. इकडील वर्तमान तरी निजामअल्लीखानांनी जागीर दाहा लाखाची व नगर व परांडा दोन किल्ले सरकारांत द्यावयाचा करार केला असतां द्यावयास अनमान करूं लागले. यास्तव डेरेदाखल होऊन फौज जमा केली. नगरचा किल्ला घेतला. बाकी जागीर व येक किल्ला येणे. यास्तव दरमजल मोगलाच्या सुमारे उदगीरीनजीक आपली फौज मातबर जमा जाहाली. येका दो दिवशी गांठ पडेल. मोगलाची फौज ह्मणावी तरी बसालतजंग त्याचा भाऊ फुटोन करनाटकास गेला. मुसाबुसीहि अरकोटीस गेला. इभराइमखान त्याजकडून निघोन सरकारांत येऊन चाकर जाहला. हणमंतराव निंबाळकर व जानोजी निंबाळकर व लक्षुमणराव खंडागळे आपलाल्या घरीच आहेत. तिगस्तां तुझी मोगल पाहिला होता त्यापेक्षा यंदा थोडका आहे. येथील मुकदमा सत्वरच फैसला होईल. चिरंजीव राजश्री दादाचें येणें अविलंबेंच त्या प्रांती होईल. तुहीं तिकडील वर्तमान वरच्यावर लिहीत जाणे. रवाना. छ २३ जमादिलावल. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [१५५] ॥ श्री ॥ २३ जानुआरी १७६०. राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. तुझी पत्र पौष वैये ४ पाठविलें तें छ २६ जमादिलावली प्रविष्ट जाहलें. अबदालीची व सरदार व वजिराचे फौजेची संनिधता जाली. अबदालीची फौज भारीच आहे. स्वामीचे प्रतापें २२३ अदवानीस. २२४ १८ जून १७५८ त बुसीला लालीने पांडिचेरीला परत बोलाविले. निजामाच्या राज्यांतील फ्रेचांची सत्ता बुसीबरोबर नाहीशी झाली. २२५ ता. ७ डिसेंबर १७५९ चे पत्र १६ जानुआरी १७६० ला पोहोचले.