पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/367

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४२ लच. जाणिजे. छ २० जमादिलावल. सविस्तर तीर्थरूप लिहितील त्याजवरून कळेल. हे विनंति. [१५३] ॥श्री॥ १२ जानुआरी १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकपंतनाना व राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीः पोण्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणे. विशेष. इकडील वर्तमान सर्व चिरंजीव बाबाचे पत्री लिहिले आहे त्याजवरून कळेल. आह्मी सर्व सुखरूप आहों. रा. दादोबा, भास्करपंत सर्व सुखी आहेत. होणार बलवत्तर तें जालें! रा. मल्हारजीबावाहि आज आले. हेहि दिल्लीकडे जातील. रेवडीपासून आह्मी इटावेयाजकडे येऊ. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. [१५४] ॥श्री॥ १३ जानुआरी १७६०, राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासः पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुहीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. वजिराकडील व अबदाली व सुजाअतदौला व रोहिले वगैरे त्या प्रांतींचें वर्तमान विस्तारें लिहिलें तें कळलें. ऐशास, प्रस्तुत अबदाली कोठे आहे ? राजश्री जनकोजी शिंदे व दत्ताजी शिंदे कोठे आहेत ? राजश्री मल्हारजी होळकर त्या प्रांतें गेले तेहि येऊन पावलेच असतील. कोणकोणाचा २२२ दत्ताजीच्या मृत्यूस अनुलक्षून हे ह्मणणे आहे.