पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/366

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लिहून पाठवावें. वारंवार आपणास पत्रे पाठविली. उत्तर येत नाही. तर ऐमें न करणे. पत्र पाठवीत जावें. राजश्री चिटकोपते यजमानांचा निरोप घेऊन जाणार. कळावें. मिती पौष वद्य ७. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. [ १५२] ॥ श्री॥ . १० जानुआरी १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासी:पोष्य रघुनाथ बाजीराव नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत जाणे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लिहिला अभिप्राय विदित झाला. प्रस्तुत इकडे मोगलाचा कलह प्राप्त जाहला आहे. याचा निर्गम थोडकियाच दिवसांत होऊन येईल. तदनंतर त्या प्रांतें फौजा रवाना होतील. प्रस्तुत मल्हारबाहि जवळ असतील त्यांस मेळवून दोन्ही सरदार येकत्र असलियास उत्तम रीतीने पठाणाचे पारिपत्य होईल. पठाणांत कांहीं फार बैलें नाही व त्यांनी मागील वर्षी दहशतहि खादली आहे. सारांश एकदिल फौज असलिया तें काम सहजात आहे. तुह्मी शाहणे तेथें आहां. हरकसे चार दिवस रंग राखा २१८ ह्या चिटकोपंतनानांवरती नानासाहेब पेशव्यांची पूर्ण मर्जी बसत चालली होती. ती इतकी की दरबारचे बहुतेक सर्व काम हे चिटकोपंतनानाच करूं लागले होते. २१९ दादा उदगीरच्या लढाईत होते हे ह्यावरून उघड आहे. दादा बिथरले होते तेव्हां ते या लढाईत नसावेत अशी शंका काव्येतिहाससंग्रहकार आणतात (कैफियत पृष्ठ ४ ) . परंतु दादांचें तें इतिहासप्रसिद्ध बिथरणे उदगीरच्या लढाईनंतरचे आहे. उदगीरच्या लढाईच्या अगोदर दादा ताळ्यावर होते व त्यांनाच पुढे अबदालीवर हिंदस्थानच्या मोहिमेस पाठवावयाचा प्रथम बेत होता ( पुढील पत्रे पहा ). २२० दादांनीं अबदालीची येथें खरी किंमत केली आहे. दोन्ही सरदारांची “ एक. दिल फौज असलिया तें काम सहजात आहे " असा त्यांचा अनुभव होता. २२१ आह्मी येईतोपर्यंत.