पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/365

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० चाळीस कोसांचे अंतर आहे. आजकरितां गांठ पडली असेल. श्रीमंतापाशी पंचवीस हजार फौज आहे. आणखी वरचेवर फौजा जमा होत आहेत. मोगलापाशी दहा हजार फौज आहे व दहा बारा हजार गाडदी आहेत. श्रीमंताचे पुण्यप्रता त्यांचे पारिपत्य उत्तम प्रकारे होईल. उभयपक्षी मुकाबला जाहलियाचे वर्तमान आलेयानंतर सविस्तर मागाऊन पाठवितों. तुमचे बंधू चिटकोपंत येथे सुखरूप आहेत व राजश्री नारोपंत नाना पुण्यांत आहेत. वरकड वर्तमान उत्तम आहे. आपणाकडील वर्तमान काय करीत होते, त्यांच्यामध्ये काय बोलणी चालली होती, ते परस्परें कोठकोठे होते, पेशव्यांस नगरचा किल्ला फितुराने तरी घेण्यास, लोकांना गोड दिसतील व स्पष्टपणे सांगतां येतील अशी, काय कारणे सांपडली, इत्यादि गोष्टीसंबंधी ग्रांटडफासुद्धा सर्व इतिहासकारांचें व वखरनविसांचे मौन आहे. मागचा पुढचा कांहीं एक संबंध न सांगतां एकदम पेशवे नगरचा किल्ला घेतात व नंतर काही दिवसांनी कोणे एके समयाचे ठायीं लढाई होऊन निजामाचा पराभव होतो इत्यादि पौराणिक कथांसारिखा कथाभाग इंग्रजी व मराठी बखरीतून लिहिलेला आढळतो. पेशव्यांच्या बखरीत ( ह्या बखरीसारखी अविश्वसनीय बखर दुसरी एखाद दुसरीच असेल ) तर “किल्ला सरकारांत घ्यावा " असें श्रीमंतांस वाटल्यावरून नगरचा किल्ला श्रीमंतांनी घेतला, अशी स्वभावोक्ति लिहिली आहे! (१) निजामाने पेशव्यांस दहा लाखाची जागीर व दोन किल्ले देऊ केले होते ते तो देईना ( १९ फेब्रुवारी १७६० चे पत्र ); तेव्हां (२) विजयादशमीच्या मुहूर्ताने ( १ अक्टोबर १७५९) नाना, दादा, भाऊ व राव हे सर्व डेरेदाखल झाले. ( भाऊसाहेबांची कैफियत ); इतक्यांत (३) नगरचा किल्ला घेतल्याची बातमी आली (लेखांक ४५, १० अक्टोबर ); तों ( ४ ) भाऊसाहेबाला मारण्याचा प्रयत्न झाला ( कैफियत पृष्ठ २); त्याचा निकाल लाविल्यानंतर (५) पेशवे मंडळी नगरास गेली (१९ फेब्रुवारी १७६० चे पत्र); नंतर (६) नाना सिद्धटेकी व भाऊसाहेब राक्षसभुवनी २९ डिसेंबर १७५९ पर्यंत होते (लेखांक १४९)(७) तेथें मोगल “ दहा लाखाची जागीर व परांडे येथील किल्ला दण्यास" तयार झाला, पण तें बोलणें आतां इतका खटाटोप व त्रास झाल्यावर पेशवे कबूल करीतना ( लेखांक १४९ ) (८) तेव्हां लढणे हाच मोगलाला शेवटचा उपाय राहिला; मग (९) भाऊसाहेबांनी परळीवरून जाऊन मोगलाला उदगीर येथे गाठला. इतक्या प्रकरणांपैकी काहींचा नामनिर्देश आमच्या ह्या पत्रांत आला आहे. उदगीरच्या लढाईचे वर्णन पुढील एकदोन पत्रांत दिले आहे.