पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/364

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्मणून राहिले. काम विलंबावर घालावें हाणून राहिले नाही. बरें, आह्मी लिहितों तें प्रमाण नसेल. काय निमित्य की दिवसगत कामास लाविलियास कांहीं नफा आमाप्त असेल. तर सरकारी कार्य जितकें उरकलें, फडशा झालें तेंच उत्तम आहे. बरें! येथे राजश्री भास्करपंत, दादोपंत आहेत. हे तो सांगतील. आनी मथुरेवरून येत आहों. कांहीं सरकारी पथके ठेवावी लागली. जे राहतील ते ठेऊन. आह्मी दरमजलींनी येतो. तमीं उतावळी न करणे. आह्मी येथे एकंदर राहत नाही. इलाज काय करावा ? अबदाली अकस्मात् आला. यास इलाज काय ? बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. [ १५१] ॥ श्री ॥ ९ जानुआरी १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंतदाजी स्वामींचे सेवेसीः पोष्य बाबूराव नरसिंह कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. सांप्रत पत्र येऊन परामृश होत नाही. तरी ऐसें नसावें. निरंतर पत्रीं सांभाळ करीत असले पाहिजे. यानंतर देशींचें वर्तमान तरी मोगलाशी बिघाड जाहला. श्रीमंतं राजश्री भाऊसाहेब परळीनजीक गेले. मोगलास यांस । २१७ १०अक्टोबर १७५९ रोजी कविजंगाने श्रीमंतांच्या हातांत नगरचा किल्ला दिला ( लेखांक ४५ ). त्यावर्षी दसरा १ अक्टोबर १७५९ रोजी पडला होता. भाऊसाहेबांच्या कैफियतीत ( पृष्ट ३ । ४) कार्तिक शुद्धांत ह्मणजे २१ अक्टोबरानंतर नगरचा किल्ला भाऊंनी स्वतः घेतला ह्मणून हटले आहे ते अर्थात् बराबर नाही. भाऊसाहेब वानवर्डास असतां विसाजी कृष्णाने नगरचा किल्ला फितुराने घेतला हीच गोष्ट खरी आहे हे पुढे १९ फेब्रुवारी १७६० चे पत्र दिले आहे त्यावरून निश्चित आहे. १५ जमादिलाखरीं ह्मणजे ३ फेब्रुवारी १७६० रोजी उदगीरची लढाई झाली. तोपर्यंत, ह्मणजे नगरचा किल्ला घेतल्यापासून अथवा १० अक्टोबर १७५९ पासून तो ३ फेब्रुवारी १७६० पर्यंत, सरासरी चार महिन्यांचा अवकाश रहातो. त्या अवकाशांत पेशवे व निजाम हे दोघे