पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/363

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जाले. बुनगे जाटाचे मुलखांत रवाना केले. आपण सडे होऊन यमुनापार शामलीमेरट्यारोखें जातात. आह्मी मथुरेवरून येतो. राजश्री मल्हारजीबावा बळवेड्यास लागले होते. ते बळवडा घेऊन ठाणे बसवून झीलाडेयास आले. दरमजलींनी येतात. ते व हे एक झालियाउपरि बंदोबस्त उत्तमच होईल. चिंता नाही. आमी उगेंच येथे काय झणून राहून ? अबदाली अकस्मात् आला. याचे कबिले बुनगेयांत टाकून येतां नये. आतां हेहि खासा बुनगेयांत आले. आह्मांस निरोप दिल्हा. बुनगेहि रवाना केले. दरमजलींनी येतो. रुमाल पाठविले नाही ह्मणून तुह्मास संदेह आला. तर पहिले पत्र पावले असते तर पाराजीपंत याची माणसें गेली, त्याजबराबर पाठवितों. ते सिकंदरेयास पावलियावर तुमचें व चिरंजीव बाबाचे पत्र पावले. तेच रोजी कुच जाहले. ते तमाम मुलखांत गडबड जाली. माणूस निभावेनासें जालें. कागदाचे काम ; रुमाल मार्गी गेले तर कामच नासल, २१५ मल्हारराव होळकर ११ नोव्हेंबर १७५९ च्या सुमारास जयपुरास आले (लेखांक १४३ ). तेव्हां मदतीस येण्याकरितां शिंद्यांनी त्यांस पत्रे धाडली परंतु ३ जानेवारी १७६० पर्यतहि त्यांस मदतीस येण्यास फावले नाही. मध्येच जयपर संस्थानांतील लहानसहान ठाणी उगाच घेत बसून त्यांनी निरर्थक कालक्षेप केला. शेवटी १० जानेवारी १७६० रोजी दत्ताजी लढाईत पडल्यानंतर दुसरे दिवशी कोटपुतळी येथे शहाजणे वाजवीत मल्हारवा जनकोजीस येऊन मिळाले (भाऊसाहेबाची बखर पृष्ठ ७७ व लेखांक १५३ ). दत्ताजीच्या मृत्यूची वार्ता आपल्यास माहीत नाही असे दाखविण्याकरितां शहाजणे वाजवावी लागली ! इतके जवळ असून मल्हाररावाला दत्ताजीच्या मृत्यूची वार्ता कळली नाही हे संभवत नाही. २१६ फडणीस इतके दिवस रुमालाचीच वाट पहात बसले होते व त्याकरिता त्यांनी गोविंदपंताला वारंवार लिहिलेंहि होते. असे असल्यामुळे, पन वेळेवर पावलें नाहीं ह्मणून रुमाल पाराजीपंतावरोवर पाठवता आले नाहीत ही सबब अगदी लंगडी होती. गोविंदपंताच्या मनांतून रुमालहि पाठवावयाचे नव्हते व स्वतःहि जावयाचे नव्हतें. अबदाली अकस्मात् आला व त्यामुळे गड़बड झाली ही सबब गोविंदपंताला बरी मिळाली होती असें नाहीं. कारण शुक्रतालास दत्ताजीला अवदाली भेटल्यापासून गोविंदपंतांनी शवूशी झुंज घेतल्याचा कोठे दाखला नाही. दत्ताजीच्या पाठीमागे सरकत सरकत ते दिल्लीकडेसच येत होते.