पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/362

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन मजली पुढे गेले. मोगल दाहा लक्षाची जाहागीर व परांडे येथील किल्ला देत होता, परंतु श्रीमंती मान्य केले नाही. त्याचे गळा पडावयाचा मजकर आहे. आठा पंधरा रोजांत गांठ पडावी ऐसें आहे. सविस्तर वरचेवर लिहीतच आहों. राजश्री चिटकोपंत सुखरूप आहेत. तुह्मांस पत्र दिल्हें ते पाठविले आहे. श्रीमंतांबराबर आहेत. कळावे. सर्वदा पत्र पाठवून सांभाळीत असावें. मित्ती पौष शुद्ध १०. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. [ १५० ] ॥ श्री॥ ३ जानुआरी १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकपंतनाना व राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसी:सेवक गोविंद बल्लाळ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ छ १३ जमादिलावलपर्यंत मुकाम नजीक सोनपथ येथे यथास्थित असे. विशेष. आमचें लौकर त्या प्रांतास येणे होत नाही याकरितां आपण देशास जाऊं झणतात ह्मणून चिरंजीव राजश्री बाबांनी कितेक तपशिले लिहिले. त्यास, आह्मीं दाटून तिकडे न यावें ऐसें नाहीं. शुक्रतालाहूनच निशेन यावें तों अबदालीची फौज आली. अकस्मात् अबदालीच येऊन पोहोचला. त्याजवरून दिवसेंदिवस गुंता पडत गेला. याउपरि राजश्री पाटीलबोवा फौजसुद्धा दिल्लीस जाणार. अबदाली व रोहिले शुक्रतालीच आहेत. आह्मीं पाटीलबावाचा निरोप घेतलाच आहे. दिल्लीपावेतों बरोबरीच येऊन. दिल्लीपुढे मजलदरमजल त्या प्रांतास येतो. येविशीं संशय आपले चित्तांत एकंदर न आणावा. खामखा जलदीने येऊन पोचतों. औज येऊन दिल्लीस दाखल - २१४ मागील वाक्यापर्यंत सोनपतास असतांना छ १३ जमादिलावरी गोविंदपंतांनी हे पत्र लिहिले. · नंतर काही कारणाने ते तसेंच ठेवून दिल्लीस आल्यावर येथून पुन: पुढे लिहिले. येथून पुढच्या सगळ्या पत्रांची शाई निराळी आहे.