पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/361

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकलक्ष बाराहजार दोन रुपये करार केले असत. दरोबस्त प॥ सोडऊन सदरहू नजरेचा ऐवज बसूल घेऊन सरकारांत पावता करून पावल्याचा जाब घेणे. कलम १ परगणे मोधा दीड लाख रुपयांचा आहे. त्यापैकी निमे पाऊणलक्षांचा रायसिंगाकडे चालत आहे. बाकी निमे परगणा जगतराज व पहाडसिंग, गुमानसिंग यांणी घेतला आहे. तो तुह्मीं सोडवणे. त्यापैकी निमे साडेसततीस हजारांची जागा रायसिंग यासीं देऊन बाकी निमे साडेसततीस हजारांची जागा तुह्मीं आपणाकडे घेऊन त्याची कमावीस तुह्मीं करून कच्चाहिशेब सरकारांत देत जाणे. तेथील आकार होईल त्यापैकी कारकुनास व शिबंदी खर्च लागेल तो कार्याकारण करून बाकी ऐवज सरकारांत पावता करून पावल्याचे जाब घेत जाणे. तेणेप्रमाणे मजुरा पडेल. कलम १ प. येणेप्रमाणे दोन कलमें करार करून दिल्ही असेत. सदहूं लिहिल्याप्रमाणे वर्तणुक करणे. जाणिजे. छ ८ जमादिलावल सु॥ सितेनमय्या व अल्लफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ १४९] ॥ श्री ॥ २९ डिसेंबर १७५९. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंतदाजी स्वामीचे मेवेसी:पोष्य बाबूराव नरसी कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. सांप्रत पत्र येऊन वर्तमान कळत नाही. तरी ऐसें न कीजे. सदैव परामृश करीत असावें. देशींचें वर्तमान तरी मोगलासी बिघाडाचा मजकूर जाला. थोरले श्रीमंत येथे सिद्धटेकावरी एका दो रोजी पुढे जातील. श्रीमंत भाऊसाहेब राक्षसभुवनांतून दौंडाजवळ पेडगावापासून दोन कोसांवर भीमेच्या कांठी गणपतीचें स्थान. अविनायकांपैकी.