पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लागते. “ बहुत लोक मेळवून एक विचारें भरण्याचें " काम शिवाजीने संतमंडळीकडून करविले. ह्या क्लप्तीला अनुलक्षून समर्थ ह्मणतातः- " ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या । संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥” ह्या एक विचाराने भरलेल्या मंडळ्यांचे पुढारपण शिवाजीने व त्याच्या मुत्सद्यांनी स्वीकारिलें ; आणि स्वराज्याची स्थापना करण्याचे अतिमानुष कृत्य घडवून आणिलें. येणेप्रमाणे महाराष्टेतर प्रांतांतील हिंदुधर्म + धर्मस्थापना + गोब्राह्मणप्रतिपाल + स्वराज्य स्थापना + एकीकरण + धरीधरण ह्मणजे महाराष्ट्रांतील हिंदुधर्म होतो अशी त्या काळी समजूत होती. ह्याच समजतीला महाराष्ट्रधर्म ह्मणून समथानी संज्ञा दिली आणि ह्या धर्माची स्थापना व प्रसार करण्याकरितां शिवाजी महाराज व त्यांचे अनुयायी ह्यांनी प्राणांचा व वित्ताचा अपरंपार व्यय केला. महाराष्ट्रतर प्रांतांतील हिंदुधर्मास सहिष्णु हिंदुधर्म ह्मटल्यास व महाराष्ट्रांतील हिंदधर्मास जयिष्णु हिंधर्म ह्मटल्यास ह्या दोन्ही धर्मातील भेद उत्कटत्वेकरून स्पष्ट होईल. दामाजीपंताच्या वेळचा स्तब्ध विठोबा सहिष्णु हिंदुधर्माची मूर्ति आहे व सम चा उड्डाण करणारा मारुति जयिष्णु हिंदुधर्माची पताका आहे. सारांश, १६४६ पासून १७९६ पर्यंत ह्या कल्पनेला मराठे साक्षात् स्वरूप देत होते व बरोबर १५० वर्षे ह्या कल्पनेच्या धोरणाने मराठे चालले होते. महाराष्ट्र धर्माची ही कल्पना मराठ्यांच्या ह्या १५० वर्षांतील हालचालींची केवळ प्राणभूत आहे. आता ह्या कल्पनेचा निरनिराळ्या काळी कसकसा आविष्कार झाला ते सांगतो. (अ) स्वराज्यस्थापना हे एक महाराष्ट्रधर्मातील मुख्य अंग. तत्साधनार्थ शिवाजीमहाराजांचे सर्व प्रयत्न चालले होते. दुर्दैवाने शिवाजी महाराजांचा अस्सल लेख अद्यापपर्यंत एखादा दुसराच उपलब्ध आहे. काव्येतिहाससंग्रहांतील ४११ वें पत्र शिवाजीमहाराजांनी १६५९ त लिहिले आहे. त्यांत राज्य आक्रमिण्याकरितां परराज्यांतील देसाई, देशपांडे यांस ते काय काय लालुचा दाखवून बांधून घेत असत हे अंशतः कळण्यासारिखें आहे. ह्या पत्राचा सवंद उतारा खाली देतो. तहनामा राजश्री खेमसावंत व लखमसावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पितांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला. सुरू सन तिस्साखमसैन अल्लफ. __ प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत, स्वराज्य साधनाच्या ठायीं वकिलापाशी आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल मध्ये राहून तुरुक लोकांचे साधान करावें. निम्मे हुजूर पावता करावा. निम्मा आकार ... ... ... ... ... कलम १. राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हजरत डेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चा- कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या करीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार नेमणुकीबद्दल हुजर अम्मल पैकी पावतें करावें. लोकांनिशी सेवा करावी. खासा जातीनें । ....... ... ... कलम १.