पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ मणजे त्या काली महाराष्ट्रांत व कर्नाटकांत जिकडे तिकडे मराठे निष्कारण धांवतांना परकीय इतिहासकारांना जे दिसतात ते मनांत काही विशिष्ट हेतु धरून शिस्तवार मोहिमा करीत आहेत असें भासू लागतील. शिवाजीला चोर व त्याच्या अनुयायांना गनीम ह्मणून यवनांनी टोपणनांवें दिली. त्यांचा वाच्यार्थ घेण्याची जी परकीय इतिहासकारांना खोड लागली आहे ती ते टाकून देतील व देव, धर्म आणि स्वराज्य ह्यांची स्थापना करणाऱ्या पृथ्वीवरील महापुरुषांच्या मालिकेंत ह्या पुण्यश्लोक व परमप्रतापी पुरुषाला आडेवेढे न घेतां गोवू लागतील. आतां हा महाराष्ट्रधर्म ह्मणजे काय ? ख्रिस्तीधर्म, महमुदीधर्म, यहुदीधर्म ह्यांच्यासरिताच हा महाराष्ट्रधर्म आहे की काय ? तर तो तसा नाही. महाराष्ट्रधर्म ह्मणजे हिंदुधर्मच की नाही? तर महाराष्ट्रधर्म ह्मणजे हिंदुधर्महि केवळ नव्हे. महाराष्ट्रधर्माची व्याख्या हिंदुधर्माहूनहि जास्त व्यापक आहे. महाराष्ट्रांत त्या काळी चालणारा हिंदुधर्म व भरतखंडांतील इतर प्रांतांत चालणारा हिंदुधर्म ह्यांच्यांत महदंतर होते. त्या काळी भरतखंडांत सर्वत्र यवनांचे राज्य होते व त्या राज्याच्या अंमलाखाली महाराष्ट्रतर प्रांतांत प्रजा आपला हिंदुधर्म ह्मणजे व्रतें, उद्यापर्ने, उपासना, पूजा इत्यादि धर्माचार यवनांकडून कमजास्त त्रास पोहचत असतांहि, निमूटपणे चालवीत असत. महाराष्ट्रांतील प्रजा मात्र इतकी सोशीक नव्हती. देव फोडणाऱ्या, विजापूर, अहमदनगर, खानदेश, जुन्नर, कोंकण वगैरे प्रांतांवर अंमल करणा-या यवनांनी मराठ्यांना एका बाजूने अगदी सतावून सोडिले होतें व दुसऱ्या बाजूने त्यांच्यांतील प्रमुख सरदारांना व मुत्सद्यांना मोठमोठ्या मानाच्या जागा दिल्या होत्या. त्यामुळे त्या वेळच्या मराठ्यांत यवनांविषयीं संताप व तो परिहार करयाचे सामर्थ्य ही एकाच वेळी उत्पन्न झाली. धर्म भ्रष्ट करणाऱ्या, गाई मारणाऱ्या व ब्राह्मणांचा छल करणाऱ्या यवनांविषयी द्वेषबुद्धि महाराष्ट्रांत दामाजीपंताच्या वेळेपासून धुमसत होती व ती शिवाजीमहाराज अवतीर्ण व्हावयाच्या काली तर अत्यंत उत्कट झाली होती. यवनांचा उच्छेद करावयाचा हे त्य काली महाराष्ट्रांतील हिंदुधर्माचें एक कलम होऊन गेले होते. यवनांचा उच्छेद करावयाचा एवढाच त्या वेळच्या मराठ्यांचा हेतु नव्हता तर धर्माची स्थापना करून गोत्राह्मणांचा प्रतिपाल करावयाचा त्यांचा मुख्य हेतु होता. हा उत्तमोत्तम हेतु साध्य होण्यास नुसता यवनांचा उच्छेद करून काम भागण्यासारिखें नव्हते, तर स्वराज्याची स्थापना करणे जरूर होते. तेव्हां स्वराज्याची स्थापना करणे हेहि एक महाराष्ट्रांतील हिंदुधर्माचें मुख्य कलम होऊन वसले. स्वराज्याची स्थापना करण्यास दोन गोष्टी केल्या पाहिजेत असें शिवाजीच्या लक्ष्यांत आले. मराठ्यांचे एकीकरण केले पाहिजे ही एक गोष्ट व त्यांचे धुरीधरण ह्मणजे पुढारपण स्वीकारिले पाहिजे ही दुसरी गोष्ट, कोणत्याहि वेळी “बहुत लोक मेळवून एक विचारें भरल्या" शिवाय स्वराज्यस्थापनेची तयारी होत नसते व एवढेच करून काम भागत नाही; तर एक विचाराने भरलेल्या लोकांचे धुरीणत्वहि पत्करण्यास व तें पत्करून इष्ट हेतु तडीस नेण्यास महापुरुषांनी सिद्ध व्हावें