पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/359

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३४ जातील. आमी दरमजलींनी येऊन. जर करितां अबदाली न रेटे तर बुनगे घेऊन आह्मी व रूपराम कटारे जाटाची फौज असे दिल्लीवरून दरमजलींनी बुनगे घेऊन येऊन. चमेल पार करून देऊन. आह्मी इटावेयाजवळ पार येऊन. याजकरितां दोन रोज राहिलो. अबदाली व पाटीलबावा सात कोस अंतर. आज लढाई अगर प्रातःकाळी होईल. ईश्वर ज्यास यश देईल त्यास सुखें देऊं ! तुह्मांस चिरंजीव बाबांनी राहविले. त्यास, गडबडीचा समय. याजकरितां चार रोज लागले. तर संशय न धरणे. श्रीमंत स्वामीच प्रतापें बहुत भाग्य अबदाली माघारा जाण्यांत उत्तम आहे. ईश्वर उत्तमच करील. रुमाल, कारकून आणविले. गडबड जाली. खळबळ जाली. याजकरितां आमांस येथे राहणें नाहीं. बुनगे घेऊन येऊन. तर मी व एकटे आपले फौजेनिशी येऊं तर या पत्रामागे मागे येऊन पावतों. चार रोज लागले ह्मणून उदास न होणे. कार्तिक वैध ५ श्रीमंत स्वामींनी अमदानगरचा किल्ला घेतला. अमलदारास ताकीद पाठवून हिशेब जलदीने आणवणे. बहत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. अबदालीची गडबड फार आहे. हे विनंति. [१४८] २९ डिसेंबर १७५९. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यासः २११ २२डिसेंबर १७५९. - २१२ हे वाक्य मोठे अर्थप्रचुर आहे. गोविंदपंत बुंदेले, जनकोजी शिंदे व गाजुद्दीखान ह्यांनी दिल्लीकडे जाण्यास निरोप घेतला त्यावेळी निदान गोविंदपंताचें तरी दत्ताजीशी भांडण झाले असावें. नाही तर गोविंदपंताने असे उदासीनपणाचे उद्गार काढले नसते. “ईश्वर ज्यास यश देईल त्यास देवो !” ह्मणजे दत्ताजीस यश आले काय किंवा अबदालीस आले काय, गोविंदपंताला त्याची पर्वा नाही ! २१३ १० आक्टोबर १७५९ रोजी अहमदनगरचा किल्ला पेशव्यांच्या हाती कविजंगानें दिला.