पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/358

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहेत. गडबड मुलखांत फार जाली. श्रीमंत स्वामींचे दैवेंकरून सर्व उत्तमच होईल. तमाम परगणेयाचे कारकून बोलावणे. मी सत्वरच येतो. येथे गुंता नाही. रोहिलेयासी सलूख तरी येतों, बिघाड तरी येतो. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. [ १४७] ॥ श्री ॥ २१ डिसेंचर १७५९. राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री त्रिंबकपंतनाना व राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीः पोण्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति येथील कुशल ता॥ पौष शुध २ जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. येथील कुशल वर्तमान चिरंजीव बानास लिहिले आहे, त्याजवरून कळेल. आह्मी शिंदे यांचा निरोप घेतला. यमुनेवर आलो. त्यास पासून दिल्लीवरून रूपराम कटारे तुह्मीं जाणे ह्मणून सांगितले. बुनगे पार गेले. सडे अलीकडे आज राहिलो. पार जाऊन दिल्लीकडून त्यामागे मथुरेजवळ उतरावयास येतो. र॥ भास्करपंतदादा खंदापार आहेत. चिटणिसीचें काम दादोपंत यांचे होते. देतो. पार उदयिक जातो. त्यांचेच पत्र तुझांस येईल की चिटणिसी आह्मी लिहूं लागलों, ह्मणून लिहतील. त्याजवरून कळेल. आमी पार उतरलो. काय निमित्य तरी? अबदालीची फौज सरदेआलीकडे वीस कोस, कुरुक्षेत्राहून पंधरा कोसांवर; तो आला. त्यास सडी फौज ॥ दत्ताजी शिंदे घेऊन पुढे गेले. त्याचे व ह्याचे अंतर दाहा कोसांचे राहिले. याजकरितां आम्हांस सांगून पाठविलें की आह्मी सडे गेलो. आह्मीं अबदाली रेटिला तर फार उत्तम जालें. र॥ जनकोजी शिंदे, गाजुद्दीखान वजीर व आह्मी राहिलो. त्यास, बुनगे घेऊन ॥ जनकोजी शिंदे, गाजुद्दीखान घेऊन पाटीलबावाकडे २१० पार होऊन.