पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/357

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आह्मीं येथून निरोप मार्गसीर वय १३ घेतला. दोन चार रोज किरकोळी गुंत्याकरितां राहिलो. प्रस्तान राजश्री रामाजीपंतभाऊ यांचे घरी ठेविलें. त्या सकाळी सुजातदौला याची आवई जाली की फौजसुद्धा अलीकडे झुंजावयास येतो. त्याजकरितां राहिलो. आज त्याजकडील वकील त्रिंबकदास आला. त्यास, उदईक हफीज रहिमत येणार. त्यास सलूख किंवा बिघाड दोहींतील एक पाहून जाणे ह्मणून पार्टीलबावांनी सांगून पाठविले. आमचे बुनगे तीन कोस मागे गेले. सडे येथे आहों. उद्याच्या रोजांत सर्व कळेल. दर मजलीनें इटावेयांस येतो. तुझी एकंदर जावयाचें न करणे. तुमचे मर्जीप्रमाणे, श्रीमंत स्वामीचे आज्ञेप्रमाणे, चिरंजीव बाबा तुहाांसी बोलिले, त्याचप्रमाणे करून. दुसरा अर्थ चित्तांत एकंदर न आणणें, अबदाली लाहोरास आला. शीखाँसी मोठी लढाई जाली. दोन हजार अबदालीची फौज मारली गेली. जाहानखान जखमी जाला. ते लाहोराकडेच आहेत. मागे फौज तीन हजार व पाईचे माणूस तीन हजार होते, मुलतानाकडे. त्यास, लाहोराअलीकडे सुखरूप आले. दुवाबेयांत गवार मिळोन गळाठा केला, शतद्रूनदी उतरता पलीकडे काही राहिले, कांहीं आलीकडे आले. तेथे दगा जाला. चार हजार उंट, चाळीस रुपयास बोगदी उंट मिळाला. मोहर रूपये लुटिले गेले. काळी उघडी माणसें पायीं उतारा पांचशे आली. हजार घोडे लहान थोर आले. वरकड मारले गेले. मोठी बदनक्षी झाली. दिल्ली पळाली, तमाम मुलूख इकडील पळाली. असो. अबदालीचा शह भारी येऊन पडला, इकडे रोहिले, सुजातदौले एक जाले. दोन शह पडले २०७ १४नोव्हेंबराला न जातां १७ नोव्हेंबराला जाण्याचा बेत झाला ! मनांतून फडणिसांना भेटण्याचा आशयच नव्हता. तेव्हां दोन चार रोज रहावे लागले व आतां २४ नोव्हेंबराला झाल्या हकीकताचे पत्र लिहितात. २०८ ह्या लढाईचा उल्लेख भाऊसाहेबाच्या बखरीत नाही. डफनें तर हेहि प्रकरण गाळलेच आहे. ह्या लढाईत अबदालीची बरीच बदनक्षी झाली. दोन हजार माणूस ठार झाले. हजार घोडे शत्रूने धरून नेले. पांचशे माणूस उघडे बोडके पळून आले. २०९ शब्द लागत नाही किंवा अर्थ कळत नाही.