पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/356

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ १४५] ॥श्री॥ २१ नोव्हेंबर १७५९. श्रीमहाराजाधिराज श्रीमहाराजा श्रीराजा खेतसिंघजूदेव. एते. श्रीपंडित मख्य प्रधान श्रीबालाजी बाजीरावको आसिर्वाद वचना. उहाके स्माचार सदा भले चाहिजे. इहाके स्माचार भले है. आपरंच. तमारे तरफ मीरकारका रुपया आवनेका है. सो तुम देत नही. ढील करते है. ऐसो हजर जाहीर भयो. सो य बात नीकी नाही. तो देखतपाती सीरकारका रुपया झाडियेसे पं० श्री गोविंद बलाल इतने तरफ देना. ढील नकीजौ. रुपया देनेक ढील लगी तो तुमारे परगनाकी जफ्ती होगी. मिती मार्गशीर्ष सद २ संवत् १८१६ मुः पुना. विशेष क्या लिखिये. [ १४६] ॥श्री ॥ २४ नोव्हेंबर १७५९. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकपंतनाना व राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीः पोण्य गोविंद बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल तागाईत मार्गशीर शुध ५ जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. सविस्तर चिरंजीव बाबांनी लिहिले त्याजवरून कळले. त्यास, तह्मी राहिला येणेकरून आमांस फार संतोष जाला. तुह्मी येथे लष्करी फार श्रमी जाला. तुह्मांस तरी आह्मीं काय शब्द लावावा ? तुझांस कांहींच परगणे यांत दाखलगिरी न जाली. इकडे येऊन बहुत दिवस गंतलों त्याजकरितां तमांसहि संशय जाला. त्यास, सविस्तर चिरंजीव बाबा तुझांजवळ बोलिले त्याचप्रमाणे आमी करून. त्यांत काडीइतके अंतराय होणार नाही. २०६ सरकारचा कारभार देण्याला मध्यहिंदुस्थानांतील राजेलोक बहुशः दिरंग लावीत त्यामुळे जरवेने लिहिणें पेशव्यास भाग पडे. त्याने त्यांना राग येऊन आंतून तरी शत्रूस मिळण्यास ते तयार असत.