पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/354

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२९ तर या चारसा महिन्यांत सर्व कामें फडशा होती. परंतु आमचे राशीस कोण ग्रह आला त्याणे येथे आणून फसविलें ! बरें! आतां तों कांहीं म्हणतां नये. हेहि कार्य सरकारचे मागे ठीक झाले असते. चिरंजीव बाबाची तुमची गांठ पडली असती म्हणजे आह्मी सुचिंत होतो. तेहि सत्वर माघारे जाऊं ह्मणून तेहि राहिले. त्यास, याजउपरि तुझी देशास जावयाचें न करणे. कोळी ॥ साबाजी पाटील येथे फौज सुद्धां आले. सुरजमल्ल जाट याजकडीलाह फौज काळी पाच हजार आली. र॥ मल्हारराऊ सुभेदार हेहि जयनगराकडे आले. त्यांजकडेहि सांडणी व कासीद गेले. तेहि सत्वरच येतील. येथेहि फौज मातबर जमा जाली. सुजातदौले व रोहिले एक जाले. परंतु गंगापार होऊन त्याजला येवत नाही. असो. आह्मी चारसा रोजांनी पातशा वजीर दिल्लीहून शाहाडोलेयांत काळी डेरे देऊन राहिलो. दरमजलींनी तेहि पाचवे सावे रोजी येथे दाखल होतात. पातशा वजीर यांचे कबिले जाटाचे मुलकाकडे अगरेयास गेले. अबदाली लाहोरास दाखल जहानखान ह्मणून जाला. इकडे यावे हा इरादा आहे. त्याजमुळे या प्रांतीं गडबड फार जाली. दिल्ली वोस जाली. वरकड वर्तमान तर अधिकोत्तर काय लिहावें ? या समयीं तुझी जावयाचें न करणे. आह्मांवर हकनाहक पेंच येतो. आमी सर्वस्व गुंतलों. कर्जे लोकांची देणे. येथे येऊन चार पेचांत पडलो. त्यास, पातशा वजीर येथे दाखल होताच आह्मी निरोप घेऊन तिकड़े येतो. फरुकाबादवाला व आह्मी एकत्र होऊन सर्व रोहिले ब सुजातदौले एकत्र जाले. तिकडे कोणी नाही. त्याजला पायबंद फरुकाबादेस पुल बांधोन पार गडबड करून जागा जाळावी, लुटावी. त्यास, चिरंजीव बाबास फौजेत देऊन तुह्मी आह्मी आपले कामास लागों. याप्रमाणे येथे ठहराव जाला. पातशा वजीर दरमजलींनी येत आहेत. ते येतांच आह्मी येथून निघोन येतो. याप्रमाणे काली रात्रौ पाटिलबावाशी खलबत जालें. तुह्मांस २०४ काळी ह्मणजे काल, १० नोव्हेंबर १७५९.