पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/353

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२८ [ १४३] ॥ श्री ॥ ११ नोव्हेंबर १७५९. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकपंतनाना व ॥ जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीः । पोण्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ मार्गशीर्ष वद्य ७ मु।। सुकरतला जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. परवाचे रोजों पत्र तुझांस मुजरद जोडी चिरंजीव बाबा जवळ पाठविली. परंतु मार्गी गडबड जाली. याजकरितां पावेल न पावेल ह्मणन हल्ली मुजरद जोडी पाठविली आहे. त्यास, आपण देशास जावयाचें तूर्त न करावें. श्रीमंत स्वामीची मरजी दरबारची एक प्रकारे जाली. आह्मी येथे गुंतलों. दिवसगत लागली. त्याजमुळे तिकडील रुजवात वगैरे कामकाजें आटकोन राहिली. त्यास जो विचार आहे, दरबारचा, तो सर्व आह्मीं पेशजी पत्रे पाठविली त्यांत लिहिला आहे. श्रीमंत स्वामीची बहुतच मरजी बारीक जाली आहे. येथे गुंतलों त्याजकरितां दिवसगत लागली. तुझांस परगणेयांतील जमीदार व कांहींच रुजू न झाले. तह्मांस तरी आह्मीं काय शब्द लावावा ? त्यास, तुझी दोन मास देशास जावयाचे एकंदर न करावें, तुह्मी गेलियावर आह्मांवर पेंच हक्कनाहक्क येतो. श्रीमंत हेच ह्मणतील, बाहाना करून राहिले. तर जर आह्मी बाहाना करून राहों तर आझांस नफा काय ? खावंदाची मरजी प्र॥ कार्य जाहलियाने खवंद राजी; आपला फडशा. त्यास, येथे दिवसगत लागली तरी तुझांस दखलगिरी न जाली. हेहि खरें. त्यास, आमी तुह्मांस हजार प्रकारे लिहिले तरी येथे गुंतलों खरें ? त्याजमुळे सर्व कामें नाशिलीं. दरबार सर्व सोडून येथे गुंतलों. घरचे काही असो. परंतु दरबारचा फडशा जाला ह्मणजे सर्व मेळविले. त्यास, दोन मास देशास जावयाचे एकंदर न करणे. तुमची आमची भेट जालियावर सर्व दरबारचें वर्तमान सांगू. वरकड र॥ भास्करपंत व दादोपंत यांस तपशीलवार सांगितले आहे. दरबारी कोणाची मुरवत अब तीळमात्र राहिली नाही. मीहि तिकडे असतों