पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/352

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आले. त्यास, जर तुह्मांस आमचे बरें करणें तर तुह्मीं देशास प्रस्तुत न जाणे. मजला येऊ देणे. तुमचे चित्तानुरूप परगण्याचे मागील तीन साला व पुढील जैसें पाहिजे तैसें तुमचें ठीक करून देऊन. मी येथे गुंतलों नसतो तर सर्व जमीदार तुझांस भेटते. कामकाज ठीक सुती लागते. तें न जालें. येथे दिरंग जाला. याजकरितां तुझांसहि वाईट लागले. त्यास, यासमयीं तुहीं चित्तांत दुसरा अर्थ एकवार न आणितां तुह्मीं राहावें. खजिना पुढे जाऊं द्यावा. यांत कांहीं दुसरा अर्थ चित्तांत न आणावा. जर तुझी जावयाचें कराल तर एकंदर न करणे. समय आहे. सर्वकाळ सारखा असत नाही. एकच वेळ समय पडतो. मी त्या प्रांती असतो तर इतके कशास होते ? मजला इकडे यावयास आणि कामकाजास दिरंग व्हावयास गांठ पडली. त्यास, तुह्मी याजउपरि खायीनखायी जावयाचें न करावें. तुमचे गेलियाने आमचें काम नासते. दूरदेशी पाहणे. दूरंदेश ! रांगडा! परमुलूख! जिवावरील खेळ ! याजप्रमाणे आहे. आमी च्यार रुपयास गुंतलों. काल, देश, वर्तमान, लोकांचे देणे याजमुळे रात्रंदिवस जिवास घोर ! तुमचे मनीं संशय आला. दोन वर्षे जालीं. कांहींच परगण्याचे आवसान न सांपडे. हेंहि खरेंच! त्यास, याजमागे इकडील गुंतेयामुळे जालें तें चित्तांत न आणणे. याजउपरि माझे यावयाचा मात्र गुंता आहे. त्यास, मी सत्वर येथे हरकोणास ठेवून येतो. विलंब करीत नाही. तुह्मीं चित्तांत संशय दुसरा अर्थ न आणतां राहणे. वरकड वर्तमान वरचेवर लिहीत जाऊन. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. MERALLURA E GENER सार्वजनिक गउवाला खेड, (गे.) २०३अवश्य.