पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/351

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हे येथे या लष्करी दाखल होणार. त्यास, याप्रकारे वर्तमान जालें. काळी पत्रं पुणेयाहून चिरंजीव बाबूराव यांची आली. त्यांत जो भावार्थ होता तो साद्यंत र॥ दादोपंत, भास्करपंत यांस साद्यंत सांगितला. तेहि तुह्मांस तपसीलवार लिहितील. त्याजवरून कळों येईल. दरबारची, खावंदांची मर्जी एक प्रकारची जाली. आमी येथे येऊन गुंतलों. त्याजकरितां तुमीहि येथे आला. तुझांस एक जमीदार अगर पाटील तोहि भेटला नाही. तुहीं तरी काय करावे ? खावंदाजवळ गेला. त्यांणी पुसिले की तुझी कोण प्रकारे तरतूद केली. त्यासमयीं तुझांस केली असेंहि ह्मणतां नये; न केली असेहि ह्मणतां नये. दोहींकडून तुह्मी काईल व्हाल. तेव्हां आह्मांवर शब्द. -येणेप्रमाणे जालियास आमची नुकसानी. कां की ? दोन सालें झाली. तुझी एका गांवांत माहीत नाही. तुह्मांस तरी काय शब्द ? त्यास, आमी येथे गुंतलों नसतों तर या चार महिन्यांत तुझी सर्व कामकाजांत माहीत होता. आणि सर्व तुमचे नजरेत येते. तेंहि न जालं. त्यास, समय ह्मणावे तरी हिंदुस्थान गडबडले आहे. त्यास, जर तुह्मांस आमचं बरें करणे तर आपण राहावं. मीहि आठ पंधरा रोजांत हरप्रकारे निकाल करून तुह्मांजवळ येतो. ज्याप्रमाणे श्रीमंत स्वामींची मरजी त्याप्रमाणे मजला करणे आणि तुमची खुषी तेंच मजला करणे. सारांश, तुमचे गेलियाने आमचा नाश होतो. श्रीमंत स्वामीचे दरबारचे दरबारचा मजकूर तुह्मांस सर्व कळलाच आहे. त्यास, आमी मोठे समुद्रांत पडलो आहों. त्यास, यासमयीं तुह्मीं उतावळी करावीसी नाही. बरें ! तुझी समयानुरूप आह्मांजवळ आला तर तुमचे आलियाने उभयपक्षी उत्तम व्हावे. त्यास, तुझांस आह्मीं शब्द लावावा तर तुह्मांवर शब्द काय ? आह्मी येथे गुंतलों याजकरितां इतके दिवस जाले. तुमचेहि प्रत्ययास येते. चार जमीदार येते. कामकाज चालीस लागते. त्यास, मी येथे गुंतलों त्यामुळे तेहि न