पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/350

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२५ येथील अर्थ दुसरा वकील आल्याखेरीज कांहीं समजत नाही. कलमरुजवात यथास्थित होणार नाही. कलम १ येथील जुने कारभारी आहेत ते मन मानेल तैसें कारभारांत पडोन में मिळविणे ते मिळवितात. कलम १ सद प्रमाणे राजश्री बाबूरापास भाऊसाहेबी बोलावून नेऊन येणेंप्रमाणे कागद फडणिसांचे आले आहेत. तरी तुहीं सावध असणे. त्याजवरून हे वर्तमान दहा बंद अगदी तपशीलवार लिहून आजुरदार पाठविला तो छत्तीसावे रोजी येथे आला. याप्रमाणे बजिन्नस बाबूरायाचें पत्र आले तेंच बजिन्नस वाचून मला दाखविले आणि ऐशा गोष्टी सांगितल्या. हे विनंति. [ १४२ . ॥श्री॥ ८ नोव्हेंबर १७५९. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकपंतनाना व राजश्री जनार्दनपंत स्वामींचे सेवेसी: पोण्य गोविंद बल्लाळ साष्टांगनमस्कार विनंति. उपरि येथील कुशल ता॥ मार्गशीर्ष वद्य ४ म॥ सुकरतला जाणन स्वकीय कुशल करात आसले पाहिजे. विशेष. आह्मी श्री गंगा उतरून पार गेलो. आठ दाहा रोज पार तमाम जागा लुटिली, जाळिली. त्यास, रोहिलेहि आपली जागा बतंग जाले. त्यास, राजश्री साबाजी पाटील शिंदे यासी व अबदालीसी लढाई जाली. त्याजवर अबदाली भारी फौजेनिसीं आला. त्याजवर हे दरमजलींनी येथे लष्करी दाखल जाले. अबदालीचे कजीये यामुळे दिल्ली तमाम पळाली. उजाड जाली. पातशा, वजीर २०१ ह्या लढाईचा उल्लेख भाऊसाहेबाच्या बखरीत नाही. डफर्ने तर हे बहुतेक प्रकरण गाळल्यासारखेंच केले आहे. २०२ ता० ८ नोव्हेंबर १७५९. २९