पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/349

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ मागील जमा आहे त्यापैकी सोडून देऊन जमा कमी करतात. कलम १ दोन रुपये मागें ज्या महलांत सिबंदी प्यादे होते त्याचा खर्च होता तो जास्ती वाढविला. ज्या ठिकाणी पांच प्यादे राहिले होते तेथें हल्ली पंचवीस ठेवितात. कलम १ - फौज नेमणूकप्रमाणे ठेवावी ते मन मानेल तसी ठेऊन चार रुपये खर्च करावा ऐसें चित्तांत जाणून खर्च बहुत करितात. कलम १ वाटणी केली त्यास शिंद्याकडे एक परगणा पांचा लाखाचा गुजाराविशीं होता तो दिल्हा व जे सिबंदी बहुत नलगे ते परगणे त्याजकडे दिल्हे. बहुत सिबंदी लागती ते परगणे सरकारांत ठेविले. कलम १ उभयता चिरंजिव भेटी व नजराणे आंतस्ते घेतात. कलम १ ___ आह्मी कर्ज जमा धरून सीलेदार यास मात्र रोजमारा देतों; महालाचा अगर आणीक कोठील दाखला आजपर्यंत किमपि नाही. कलम १ आझांकडे माणूस आले त्यास बरें पहात नाहीं; मग जमीदार आला तरी तो जीवें कैसा राहील ? या दहशतीमुळे कोणी येऊन आह्मांस भेटत नाही. कलम १ वात करून घेऊन संशयाच्या स्थळी कामगार पाठवून चौकशी करणे. ही चौकशी होऊ नये ह्मणून पेशव्यांचे कित्येक सरदार हिशेबाचे ताळेबंद वेळेवर पाठवून देत नसत. हाच प्रकार गोविंदपंत बुंदेल्यांनी केला व ह्मणून प्रत्यक्ष परगण्यांत जाऊन चौकशी करण्याकरितां येरंडे व कानिटकर यांस पेशवे यांनी पाठवून दिले. वेळेवर हिशेव पाठवून देत नाहीत ह्या आरोपाचा हा असा अर्थ आहे. कानिटकर मुजुमदारवयेरंडे फडणीस नेमून देऊन श्रीमंतांनी गोविंदपंताचा मोठा गौरव केला असे रा. पारसनीस यांचे मत आहे ( मराठ्याचे पराक्रम, बंदेलखंड प्रकरण, पृष्ठ १०३ ). परंतु, तसा काहीएक प्रकार नसून, गोविंदपंतासारख्या ओढाळ सरदाराला वठणीस आणण्यास फडणीस हे कामगार नेमिले गेले व त्यामुळे श्रीमंतांनी आपला गोविंदपंतावरील अविश्वास स्पष्टपणं व्यक्त केला. गोविंदपंत किती अपराधी होते ह्याचा अंदाज करावयाचा असल्यास, त्यांनी फडणिसांना जी गयावया करून पत्रे लिहिली आहेत ती वाचली असतां उत्तम होईल. ह्याच आशयाने गोविंदपंतांची दहाबारा पढ़ें आमी येथे दिली आहेत.