पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/348

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तशाहा मल्हारजी होळकर याजकडे जाणार ऐसें आहे. आपण राजश्री पंतांनी मजकूर लिहिला त्याजवरून कळों येईल. राजश्री बाबूराव याजकडून पत्रे आली. त्यांत मजकूर की फडनिसांनी आपले घरास राजश्री नारोपंतास वर्तमान लिहिले. त्यांनी श्रीमंतांस तीच पत्रे नेऊन भाऊसाहेबांस दाखविली. त्यास, त्यांजपाशी बातमीच होती. तें वर्तमान थोरल्यास कळतांच तेच निघोन भाऊंकडे आले. मग पत्रे पाहिली. त्यांत मजकूर लिहिला होता त्याची कलमें. गाजुद्दिन वजीर जाटाकडे न जातां दत्ताजीकडे आसऱ्याकरितां आला हे उघड आहे. त्याने आपले कविले मात्र जाटाच्या मुलुखाकडे पाठविले. २०० ही दोषांची एकंदर नऊ कलमें भाऊसाहेबांनी गोविंदपंताविरुद्ध काढिली आहेत व ती खरी आहेत हे लेखांक [३६] त गोविंदपंतानें कबूल केले आहे. तेथें तो ह्मणतो, " दरबारचा रंग पाहिला. खावंद चौकशी करूं लागला. आतां पैशाचा लोभ धरून मेळविली अब्रु ते कां घालवावी? ” ह्मणजे चौकशीच्या पुढे आपल्या अब्रूचा टिकाव लागणार नाही असें गोविंदपंतास स्पष्ट वाटत होते. गोविंदपंताचे हिशेब वर्षाचेवर्षास यावयास दिरंग लागत असे हे त्यांनी १७५६, १७५७ व १७५८ ह्या सालांच्या हिशेवाची रुजवात आक्टोबर १७५९ त करून दिली (लेखांक ३६) ह्या वरून कळून येईल. "मराठ्यांच्या पराक्रमांत" पृष्ठ १०८ रा. पारसनीस यांनी रा. नातू यांनी “ महादजीच्या चरित्रांत " गोविंदपंताविरुद्ध आणिलेला आरोप निराधार आहे असे काही विशेष पुरावा न देतां हटले आहे. ह्या ह्मणण्यांत विशेष तात्पर्य नाही हे लेखांक १३८ यावरून कळेल. रा. नातूंच्या आरोपाविरुद्ध पुरावा आणतांना “ पेशव्यांकडेच त्यांची जास्त बाकी निघते " ह्मणून “ पराक्रम” कार ह्मणतात, परंतु “ जास्त बाकी निघण्याशी " व वेळेवर हिशेब पाठवून दिल्याशी काय संबंध आहे नकळे. सध्यां गोविंदपंताच्या दफ्तरांत वार्षिक हिशेब असतील व त्यांत पेशव्यांकडे बाकी जास्त निघतहि असेल, परंतु हिशेब वेळेवर रुजुवातीला जात नसत हा आरोप कांही तेवढ्याने टळत नाही. हिशेब वेळेवर रुजुवातीला न गेले व वसुलानंतर दोनतीन सालांनी गेले ह्मणजे रयतेकडे व मामलतदाराकडे कसर किती निघते ह्याची चवकशी करण्यास फार पंचाईत पडते. कित्येक कुळे मरून जातात, कित्येक फरारी होतात व कित्येक बेकार होतात. त्यांच्यापासून ठरावापेक्षा जास्त पैसा मामलतदारांनी काढिला असल्यास, तो सरकाराला समजून येण्यास एकच उपाय असतो. तो हा की वेळेवर हिशेबाची रुज