पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/347

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ असतां बुनग्यांत गलबल होऊन तिहीं लष्करचे बुनगे आंग बिलगून चार कोस गेले ; शिंदे स्वारीहून आल्यानंतर मागती याच मक्कामी राहुट्या झाल्या; ऐशी लटकीच आवई पडली. त्याप्रमाणे बंदोबस्तीचों मजकूर ऐसा आहे. गंगेपार फौजा गेल्या होत्या, त्या सुजातदौला आला असें वर्तमान ऐकून फौजेनें आवई खाऊन गंगेआलीकडे अवघी फौज आली. कित्येक गंगेमध्ये वाहवले, कित्येक मोरेले गेले. त्यांणी चडीस परीधाराजवळ पलीकडील आंगें ठाणे बसविले. त्या फौजेची दहशत भारी पडली आहे. गोसावी सुजातदौल्याकडील पांचहजार फौजेनिशीं तो पुलावरून नजीबखानाचे लष्करांत आला. याउपरि बुनगे मागे आठा कोसांवर ठेवून, सध्या फौजा करून, या तळावर असावे याप्रमाणे करणार आहेत. लाहोराकडे अबदाली आला. त्याची व साबाजी पाटील याची लढाई झाली. त्याची फौज भारी ऐसें देखोन साबाजी पाटील मजलदरमजल येथन आठाकोसांवर आले आहेत. उदईक साबाजी पाटील लष्करांत येणार. अबदाली सिदरेवर आहे. अद्यापि आला नाही. परतु येणार ही गडबड आहे. दिल्ली अगदी पळोन गेली. वजीर व पा १९७ दत्ताजी, जनकोजी व गोविंदपंत ह्या तिघांच्या सैन्यांतील बुणगे. १९८ भाऊसाहेबाची वखर पृष्ट ५२ पहा. १९९ हिंदुस्थानांत आवयांचे महत्व विशेष आहे. ज्या स्थळी किंवा ज्या काळी किंवा ज्याच्या संगतीस असतां कांहीं अरिष्ट आले त्या स्थळी किंवा काळी किंवा त्याच्या संगतीस पुन्हा येण्याचा प्रसंग आला असतां हिंदुस्थानांतील माणसें घाबरतात ही अनुभवांतील गोष्ट आहे. अशा आवयांवर विश्वास ठेऊन गडबड हाऊ देणे ह्मणजे बंदोबस्त करणे नये असा गोविंदपंताच्या लिहिण्याचा मतलब आहे. 5 ग्रांटडफ आपल्या इतिहासाच्या एकविसाव्या भागांत ( पृष्ट ३११ मंबईप्रत ) लिहितो की वजिराने जाटापाशी आस्रा घेतला. परंतु ह्या पत्रांत गोविंदपंत ह्मणतो की वजीर मराठ्यांच्या लष्करांत पांचसहा रोजांत येणार. पढ़ें वजीर दत्ताजीच्या लष्करांत येऊन दाखलहि झाला लेखांक ( १४३ ). दत्ताजी अबदालीस भिडण्याकरितां सरदेस गेला तेव्हां जनकोजीला व गोविंदपंत बुंदेल्याला त्याने दिल्लीकडे जाण्यास सांगितले व त्यांच्या बरोबर गाजुद्विनालाहि धाडले. ( लेखांक १४७ ). ह्यावरून