पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/346

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२१ जातील. तुझी पुढे इटावी, कोच, झांशी जागजागा पावाल. तेथून सुखरूप पावलियाची व नवल विशेष वर्तमान असलेलें तें लिहीत जाणे. अबदाली कुरुक्षेत्रास येऊन पोचला. यास्तव चोहीकडे दंगा दिसतो. देशीहि दंगा ह्मणून ऐकतो. याजकरितां तुह्मीं जावयाचा विचार एकवार न करावा. खजिना सरकारचा झांशीस लावून द्यावा. तेथे किल्ला आहे. जाऊन राहील. तुझी एकंदर जायाचा विचार न करावा. सोबाजी शिंदे येऊन फौजेंत सामील झाले. अबदाली सतलज नदीवर आहे. खासा लाहोरास आहे. जहानखान सतलज नदीवर आहे. तुझी पुढे एकंदर न जाणे. मागाहून मुजरत जोडी तुह्मांकडे पाठवितों. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे विनंति. [१४१] ७ नोव्हेंबर १७५९. विनंति. वेदमूर्ति राजश्री बापुभट झांशीस होते. त्याचे पत्र आले होते की, आझी छ २९ सफरी निघोन मजलदरमजल श्रीस गेलो. तुहीं पितांबर आणविला आहे. त्यास, तेथे गेल्यानंतर पितांबर मुजरद माणसाबरोबर पाठवून देतो असे लिहिले होते. त्यास, वेदमूर्ति क्षेपनिक्षेप गेले. तुह्मांस पितांबर खामाखाय पाठवून देतील. चिंता नाही. आपण पितांबराची दुसरी तर्पद न करावी. क्षेपनिक्षेप लवकरच होईल. कळले पाहिजे. येथील मजकूर तरी आज छ १६ रोवली ऐसी आवई पडली की नजीबखान बाहेर निघाला; अवघ्या फौजा तोंडावर O १९५ अबदालीच्या फौजेची आघाडी. १९६ ह्या पत्राप्रमाणे साबाजी शिंदे ४ नोव्हेंबर १७५९च्या आंत किंवा त्या दिवशी फौजेंत येऊन मिळाले असे होते. परंतु पुढील पत्रांप्रमाणे ते १० नोव्हेंबराला सामील झाले असे घ्यावे लागते. पहिल्या पत्रांत सावाजी ह्मणजे साबाजीचं सैन्य व दुसऱ्या पत्रांत साबाजी खुद्द असा लाक्षणिक अर्थ घेतल्यावांचून गत्यंतर नाही.