पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/345

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२० होते. तुह्मीं पंधरा दिवस इटावीसच राहून मागाहून सविस्तर आह्मी लिहून पाठवितो. एकंदर न जाणे. दक्षणेकडेहि मोगलासी कजीया. मार्ग निभावत नाही. तुझी पुढे न जाणे. आह्मी मुजरद जोडी प॥ त्याजबद्दल लिहून पाठवून. पुढे एकंदर न जाणे. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे विनंति. [१४०] ॥श्री॥ ४ नोव्हेंबर १७५९. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामींचे सेवेसीः पोण्य गोविंद बल्लाळ साष्टांगनमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय तागाईत कार्तिक शुद्ध १५ पावेतों लिहिले पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें हरिद्वाराचे मुक्कामी पावले. सविस्तर कळों आले. तिकडील वर्तमान लिहावें ह्मणून लिहिले. त्यास, आझी श्री गंगापार उतरून जलालाबादेपावेतों गेलो. तेथें जाबताखान नजीखानाचा लेक होता. त्यास मादुलाखान, दुंदेखान व हापसरहीम रोहिले तमाम सामील जाहले. रोज लडाई होई. रोहिलेच शिकस्त खाऊन जात. ये॥ दाहाबारा रोज होतो. पेंढारी यांणी तमाम मुलूख लुटिला, शहरें लुटिली, जाळली. कोठे मुलखांत दाणा, गुरूं अगर वस्तभाव राहिली नाही. त्याजवर नवाब सुजातदौले रोहिल्याच कुमकेस आले. त्याजवरून फौजा फिरोन माघान्या आल्या. त्याचेहि वकील जाबसाल आले आहेत. सुजातदौल्याशीं ठीक करून मग फौजा फिरोनहि पार १९४ हे पत्र कार्तिक शुद्ध १५ चे आहे. पूर्णिमेला मराठ्यांचे सैन्य हरिद्वाराला पोहोंचून निदान बारा दिवस झाले होते. तेव्हां भाऊसाहेबाच्या बखरींत ( पृष्ठ ५१ ) मराठे कार्तिक शुद्ध प्रतिपदेस हरिद्वारास गंगापार झाले ह्मणून पटलें आहे ते संभाव्य असून, टीतील कार्तिक वद्य प्रतिपदा ही तीथ अगदीच अग्राह्य आहे. भाऊसाहेबाच्या बखरींतील सर्व तिथी दक्षिणी मित्तीच्या आहेत.